गजब बेइज्जती! तीन वर्षांपूर्वी अनिल कपूर यांनी उडवली होती उर्वशी रौतेलाची खिल्ली, नेमकं काय घडलं होतं? By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 03:01 PM 2023-01-08T15:01:15+5:30 2023-01-08T15:08:07+5:30
Urvashi Rautel: ...तर घटना 2019 सालची आहे.. यावर्षी उर्वशीचा ‘पागलपंती’ सिनेमा आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उर्वशी अनिल कपूर, कृती खरंबदा, पुलकित सम्राट सगळे ‘बिग बॉस 13’मध्ये पोहोचले होते. ‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसं राहायचं हे उर्वशीला चांगलंच कळतं.
सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह आहे. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी उर्वशी सध्या मात्र एका वेगळाच कारणाने चर्चेत आली आहे. तिकडे रिषभ पंतचा अपघात झाला आणि इकडे उर्वशीची चर्चा सुरू झाली.
उर्वशीने अनेक कलाकारांसोबत काम केलं. पण एकदा अनिल कपूरने मस्करी मस्करीत उर्वशीची ‘गजब बेइज्जती’ केली होती. 2019 साली नॅशनल टीव्हीवरच्या या अपमानाने उर्वशी चांगलीच हिरमुसली होती.
तर ही घटना 2019 सालची आहे.. यावर्षी उर्वशीचा ‘पागलपंती’ सिनेमा आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उर्वशी अनिल कपूर, कृती खरंबदा, पुलकित सम्राट सगळे ‘बिग बॉस 13’मध्ये पोहोचले होते.
यावेळी उर्वशी व कृती दोघीही अनिल कपूर व सलमानसोबत एक गेम खेळताना दिसल्या होत्या. दोघींनाही आळीपाळीने सलमान व अनिल कपूरला एक एक प्रश्न विचारायचा होता.
अशी कुठली गोष्ट आहे जी अनिल कपूरजींनी कधीच करायला नको? असा प्रश्न कृती सलमानला विचारले. सलमान यावर उत्तर देण्याआधीच अनिल कपूर याचं उत्तर देतात. मला कोणीही जी...जी... म्हणू नये.., असं अनिल कपूर म्हणतात. यावर उर्वशी त्यांना ‘एके’ म्हणते.
मग काय, यावर सगळे उर्वशीची मस्करी करायला लागतात. अनिल कपूर कधीच रिटायर होणार नाहीत, असं सलमान म्हणतो आणि लगेच उर्वशीकडे पाहत, ‘पण तू रिटायर होणार एक दिवस... तू अनिलच्या आईची भूमिका साकारशील असं मला वाटतंय,’अशा शब्दांत तो तिची खिल्ली उडवतो.
यावर मला सुद्धा हेच वाटतंय, असं कृती खरबंदा म्हणते आणि हे सगळं ऐकून उर्वशीचा चेहरा पडतो. पण हा खिल्ली उडवण्याचा प्रकार इथेच थांबत नाही.
उर्वशीसारखी आई असेल तर आनंदच होईल, असं अनिल कपूर म्हणतात आणि सगळे पुन्हा एकदा हसायला लागतात.
उर्वशी प्रश्न विचारताना हातवारे करत बोलते. त्यावरूनही अनिल कपूर तिची मजा घेतात. हा काही अवार्ड शो नाही आणि तू काही होस्ट नाहीस... असं का बोलतेय, नॉर्मल बोल ना... मोकळेपणाने बोल. घाबरू नकोस, असं ते म्हणतात.
नॅशनल टीव्हीवर अशी खिल्ली उडवली गेल्यावर उर्वशीची अवस्था काय होईल? तिचा चेहरा खर्रकन उतरतो. ती सगळं खिलाडूवृत्तीने घेते खरी पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं काही सांगतात...