रमजान ईदला चोख बंदोबस्तात सलमानकडून चाहत्यांना शुभेच्छा; भाईजानसोबत दिसणाऱ्या छोट्या मुलांची चर्चा

By देवेंद्र जाधव | Updated: March 31, 2025 18:53 IST2025-03-31T18:29:39+5:302025-03-31T18:53:13+5:30

रमजान ईदनिमित्त कडक बंदोबस्तात सलमान चाहत्यांना भेटायला आला. त्यावेळी सलमानसोबत असलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं (salman khan)

सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमान खानचा ईदनिमित्त 'सिकंदर' सिनेमा रिलीज झालाय

रमजान ईदच्या दिवशी सलमानने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीत येऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सलमानसोबत असलेल्या लहान मुलीने सर्वांचं लक्ष वेधलंय.

सलमान ईदच्या दिवशी छोट्या मुलीचा हात धरुन तिला गॅलेक्सीच्या गॅलरीत घेऊन आला. सलमान पांढऱ्या पठाणी कुर्त्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

सलमानसोबत फक्त छोटी मुलगीच नाही तर एक छोटा मुलगाही दिसत होता. हे दोघंही सलमानचे भाचा-भाची असून त्यांचं नाव आहे आहिल आणि आयत शर्मा.

सलमान यावेळी ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटायला आला. तेव्हा त्याच्या या दोन भाच्यांना घेऊन आला. सलमानच्या या क्यूट भाच्यांनी सर्वांचं मन जिंकलं.

बुलेटप्रूफ काच आणि चोख बंदोबस्तामध्ये सलमानने भाच्यांसोबत ईद साजरी केली. सलमानची एक झलक बघण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी झुंबड उडाली होती.

सलमानची बहीण अर्पिता खानची दोन मुलं आज सलमानसोबत दिसली. सलमान खानचा ईदनिमित्त रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो.