IN PICS : दो दिल मिल रहे हैं मगर..., बॉलिवूडच्या ‘सीक्रेट’ कपलची चर्चा जोरात...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:33 PM2022-12-11T17:33:37+5:302022-12-11T17:46:53+5:30

Lovers in Bollywood : बॉलिवूड स्टार्स लव्ह अफेअर्समुळे चर्चेत असतात. सध्या बी-टाऊनच्या अनेक अफेअर्सची चर्चा आहे. हे स्टार्स गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. कोण आहेत हे स्टार्स?

बॉलिवूड स्टार्स लव्ह अफेअर्समुळे चर्चेत असतात. सध्या बी-टाऊनच्या अनेक अफेअर्सची चर्चा आहे. हे स्टार्स गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. कोण आहेत हे स्टार्स?

होय, सलमान स्वत:पेक्षा 24 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री कोण? तर तिचं नाव पूजा हेगडे. पूजा व सलमानच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्रेड अ‍ॅनालिस्ट उमैर संधू याने एका ट्विटमध्ये सलमान व पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभास व बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरात आहे. ‘आदिपुरूष’ या आगामी सिनेमात प्रभास व क्रिती दोघंही एकत्र दिसणार आहेत. चर्चा खरी मानाल तर याच चित्रपटाच्या सेटवर क्रिती व प्रभास यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चर्चेत आलेली रिया चक्रवर्ती आता पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. रियाच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचं समजतंय. बंटी हा रिअ‍ॅलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेटर यांच्यामधील संबंध सगळ्यांनाच माहित आहेत. आता यात आणखी एक भर पडली आहे. होय, अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा जोरात आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. तू साराला डेट करतोय का? असं अलीकडे शुभमनल विचारलं गेलं. यावर कदाचित, असं तो म्हणाला.

दिशा पाटनी कधीकाळी टायगर श्रॉफच्या प्रेमात होती. पण नुकतंच त्यांचं ब्रेकअप झालं. आता दिशा अलेक्झांडर एलेक्सला डेट करत असल्याची चर्चा आहे. तो दिशाचा जिम ट्रेनर आहे. सध्या दोघंही एकमेकांसोबत फिरताना दिसतात.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा व अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याबाबत दोघांनीही बोलणं टाळलं होतं. परंतु, आता ते एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

कार्तिक आर्यन सध्या ऋतिक रोशन याची चुलत बहिण पश्मीना रोशन हिला डेट करत असल्याचं मानलं जात आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा कार्तिकला काम नसते तेव्हा तो पश्मिनाबरोबर घरी निवांत वेळ घालवतो. इतकंच नाही तर त्यांच्या भेटींबद्दल कुणालाही कळू नये यासाठी ते आपल्या गाड्या पुन्हा घरी पाठवून देतात.