Sam Bahadur: विकी कौशलनं सुरू केली बायोपिकची तयारी, अशी घेतोय सॅम बहादुरच्या भूमिकेसाठी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:24 PM2022-06-21T19:24:50+5:302022-06-21T19:27:49+5:30

Vicky Kaushal : विकी कौशलची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केल्याचे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने मंगळवारी सांगितले.

विकी कौशल मेघना गुलजार दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या RSVP मुव्हीज निर्मित चित्रपटात युद्ध नायकाची भूमिका साकारणार आहे. कौशलने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते आणि फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले भारतीय सैन्यातील पहिले अधिकारी होते.

'राझी'नंतर गुलजार आणि कौशल दुसऱ्यांदा 'साम बहादूर' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. 'राझी'ची पटकथा लिहिणाऱ्या भवानी अय्यरने गुलजार आणि शंतनू श्रीवास्तव (बधाई हो!) सोबत 'साम बहादूर'साठी स्क्रिप्ट लिहिली आहे.

या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​देखील आहे, जी माणेकशॉच्या पत्नी सिल्लूची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेत्री फातिमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तथापि, निर्मात्यांनी अद्याप 'सॅम बहादूर'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.