गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 17:00 IST2019-06-22T16:52:44+5:302019-06-22T17:00:46+5:30

समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया’या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

समीराने हिंदी प्रमाणेच तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

समीराचे उद्योजक अक्षय वर्देसोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे.

अडीच वर्षांच्या अफेअरनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीरा आणि अक्षयने लग्न केले होते.

समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता

२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती.

समीरा गेल्या काही वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

दुसऱ्या बाळाचा विचार आमच्या डोक्यात आधीपासूनच असल्याने मी कोणताही चित्रपट स्वीकारला नव्हता असे समीराने सांगितले होते.

समीराचा मोठा मुलगा चार वर्षांचा असून ती सोशल मीडियावर अनेकवेळा त्याचे फोटो पोस्ट करते.