"आम्ही पाकिस्तानी सानियासोबत आहोत", शोएब मलिकबरोबर फोटो शेअर करताच ट्रोल झाली सना जावेद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:24 PM2024-01-22T17:24:39+5:302024-01-22T17:32:42+5:30

लग्नानंतर सनाने पहिल्यांदाच शेअर केले शोएब मलिकसोबतचे फोटो, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. शनिवारी(२० जानेवारी) सनाशी लग्न करत शोएबने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. सानियाने शोएबबरोबरचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

शोएबबरोबर लग्न केल्यानंतर आता सना जावेदने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. सनाने शोएबबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे.

पण, यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनेकांनी सनाच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

एकाने कमेंट करत "आम्ही पाकिस्तानी सानिया मिर्झासोबत आहोत. तिच्यासमोर तू काहीच नाहीस," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "उमर जैसवालसोबतही हिने असंच फोटोशूट केलं होतं," अशी कमेंट केली आहे.

"एवढ्या प्रामाणिक पत्नीबरोबर हा राहू शकला नाही. तुझ्याबरोबर काय राहणार", असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

"हिला वाटतंय हा तिच्यावर प्रेम करेल...पण, त्याला स्वत:च्या बायकोलाही प्रेम देता आलं नाही", अशी कमेंटही केली आहे. तर एकाने "जास्त फोटो अपलोड करू नकोस...नंतर परत तुलाच डिलीट करावे लागतील," असंही म्हटलं आहे.

"सानियासाठी वाईट वाटतंय", अशी कमेंटही एकाने केली आहे.

सना जावेद एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. शोएबआधी सनाने उमर जयस्वालसोबत निकाह केला होता.

२०२० मध्ये सनाने पाकिस्तानी गायक असलेल्या उमरबरोबर संसार थाटला होता. परंतु, शोएबसोबत सूर जुळल्यानंतर तिने उमरबरोबर तलाक घेतला.

तर शोएबचं हे तिसरं लग्न आहे. त्याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत २०१०मध्ये निकाह केला होता. सानियाआधी शोएबने भारतीय असलेल्या आयेशासोबत निकाह केला होता.