Sana Khan : "लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती"; सना खानने सांगितला 'तो' वाईट काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:27 IST2024-12-21T13:05:37+5:302024-12-21T13:27:15+5:30
Sana Khan : सना खान विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते.

सना खान विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. २०२३ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. आता ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.
सनाने ईटाइम्सला सांगितलं की, ती जेव्हा अनसला भेटली तेव्हा ती अत्यंत वाईट काळातून जात होती. लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने फक्त रडत होती
जेव्हा अनसशी तिची भेट झाली तेव्हा ती डिप्रेशनचा सामना करत होती. तिच्या मनात आत्महत्या करण्याचे देखील विचार आले होते.
सनाने लग्नानंतर इंडस्ट्री सोडली. ती जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तर लोकांनी तिला खूप ट्रोल केलं.
हे लग्न फक्त तीन महिनेच टिकेल, सहा महिन्यांत डिवॉर्स होईल. हिला मुलं कधीच होणार नाही असं लोक म्हणायचे असं देखील सनाने सांगितलं.
पती मुफ्ती अनसने तिला तिच्या कठीण काळात खूप मदत केली. आधार दिला आहे.
तू माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेस असं सनाने तिचा पती अनसला लग्नाआधी म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वी सनाने एका व्हिडीओमध्ये जास्तीत जास्त मुलांची आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
"मला जास्त मुलं झाली तर मला आनंद होईल. ५ मुलं असो, १० मुलं असो... पूर्वीच्या काळी लोकांना १२-१२ मुलं असायची" असं म्हटलं होतं.