sana khan speaks on how she met anas sayied showbiz and motherhood
सना खानच्या आयुष्यात कशी झाली मौलाना अनस सईदची एन्ट्री? कुठे झाली होती पहिली भेट? By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 08:00 AM2020-12-20T08:00:00+5:302020-12-20T08:00:02+5:30Join usJoin usNext सना व सईदची पहिली भेट 2017 मध्ये झाली होती. ‘बिग बॉस 6’ची स्पर्धक आणि जय हो, वजह तुम हो, टॉयलेट-एक प्रेमकथा अशा सिनेमात झळकलेली अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. यानंतर अगदी काहीच दिवसात सनाने सूरतचा बिझनेसमॅन मौलाना अनस सईदसोबत गूपचूप ‘निकाह’ केला. सनाने असे एका रात्रीत ‘निकाह’ केल्याने सगळेच हैराण झाले होते. पण आता हा एका रात्रीचा मामला नाहीच मुळी. कारण सना 2017 पासून अनस सईदला ओळखत होती. सनाने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनाने तिच्या व सईद अनसच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. सना व सईदची पहिली भेट 2017 मध्ये झाली. तिने सांगितले, आम्ही पहिल्यांदा मक्केत भेटलो होतो. मी भारतात परतली होती. ही एक छोटीशी भेट होती. अनस हा एक मुस्लिम स्कॉलर आहे, असे सांगून माझी व त्याची ओळख करून देण्यात आली होती. तो मुफ्ती नाही तर आलिम आहे. 2018 च्या शेवटीशेवटी मी स्वत: अनिसशी संपर्क साधला होता. कारण मला धर्माबद्दलचे अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती, असे तिने सांगितले. यानंतर 2020 मध्ये आम्ही पुन्हा संपर्कात आलोत. अनससोबत निकाह करण्याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. त्याच्यासारखा शौहर मिळावा म्हणून मी अनेक प्रार्थना केल्या होत्या. तो सज्जन आहे, सुसंस्कृत आहे, ही एक गोष्ट मला आवडली. तो मला जज करत नाही, ही गोष्टही मला भावली, असेही तिने सांगितले. पुढे तिने सांगितले, एकदा तो मला म्हणाला होता, एखादी वस्तू गटारात पडली असेल आणि तुम्ही तिच्यावर 10 बकेट पाणी ओतले तरी ती वस्तू साफ होणार नाही. पण ती वस्तू गटारातून काढून त्यावर एक बकेट पाणी ओतले तरी ती स्वच्छ होईल. त्याची ही गोष्ट मला खूप आवडली होती. माझ्यावर त्याचा खोलवर परिणाम झाला. ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याबद्दल ती म्हणाली, अनेक गोष्टी तुम्हाला उशीरा कळतात. मी माझ्या घरात एकटी कमावणारी होती. म्हणून मी इंडस्ट्रीत आली होती आणि इंडस्ट्रीने मला जे काही दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. पण कालांतराने मी या दुनियेसाठी बनलेलीनाहीच, याचा साक्षात्कार मला झाला. लग्नानंतर सना प्रचंड ट्रोल झाली, यावरही ती बोलली. लोकांना माझ्या लग्नाशी काहीही देणेघेणे नाही. माझे शौहर चांगले व्यक्ति आहेत. लोकांना ते आवडत नसतील पण मला आवडतात. लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही, असे ती म्हणाली. मला लवकर आई व्हायचे आहे, असेही तिने सांगितले.टॅग्स :सना खानsana khan