बाबो ! कमाईच्या बाबतीत सारा अली खान इतर अभिनेत्रींना देते टक्कर, आकडा वाचून येईल चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:38 PM2021-08-12T12:38:39+5:302021-08-12T12:50:21+5:30

छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खाननेही आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊट टाकत हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले होते.

'केदारनाथ' सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली.

अभिनयाप्रमाणेच साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत असते.

अल्पावधीतच साराने आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनय आणि सौंदर्याच्याबाबतीतच सारा इतर अभिनेत्रींना टक्कर देते असे नाही.

तर कमाईच्या बाबातीतही सारा आघाडीवर आहे.

एका सिनेमात काम करण्यासाठी साराला भलंमोठं मानधन मिळतं.

रिपोर्टनुसार सारा ब्रांडच्या जाहीरातींसाठी 50 से 60 लाख इतके मानधन घेते.

तर सिनेमात काम करण्यासाठी सारा ३ कोटी इतके मानधन घेते.

२६ वर्षाची असलेली साराची संपत्ती 14.37 कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते.

महागड्या गाड्यांचेही तिच्याकडे कलेक्शन आहे.

Mercedez Benz GLE, Range Raver Sports, BMW 520D यासारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.

सारा अली खान पूमा, फैंटा, रियलमी, वीट यासारख्या बड्या ब्रांडची ब्रांड एंबेसडरही आहे.

आगामी काळात सारा अक्षय कुमार आणि धनुषसह 'अतरंगी रे' सिनेमात झळकणार आहे.

Read in English