सरोज खान यांनी मृत्यूनंतरही केला कुटुंबाचा विचार; मुलांसाठी ठेवली तब्बल इतके मिलियन संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 18:30 IST2021-12-08T18:30:00+5:302021-12-08T18:30:00+5:30
Saroj khan: मास्टर जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सरोज खान यांनी ४ दशकं बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केलं.

आपल्या तालावर अनेक वर्ष बॉलिवूड कलाकारांना नाचवणाऱ्या दिवंगत नृत्यदिग्दर्शिका म्हणजे सरोज खान (Saroj khan). वयाच्या ७१ व्या वर्षी सरोज खान यांनी जगाचा निरोप घेतला.
राष्ट्रीय पुरस्कार विजय मिळवणाऱ्या सरोज खान यांचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत.
मास्टर जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सरोज खान यांनी ४ दशकं बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केलं. सरोज खान यांनी जवळपास २ हजारांपेक्षा जास्त गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं.
बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला असंख्य नृत्यदिग्दर्शक पाहायला मिळतात. मात्र, सरोज खान यांच्या सारखी प्रसिद्ध अजूनपर्यंत कोणाला मिळालेली नाही. सर्वात श्रीमंत नृत्यदिग्दर्शकांमध्ये आजही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळेच सरोज खान यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेऊयात.
फोर्ब्स, आयएमडीबी आणि अन्य काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार, सरोज खान यांची एकूण संपत्ती ५ लाख मिलियन डॉलर्स इतकी आहे.
तसंच 'द टॉप एव्हरीथिंग' या युट्यूब चॅनलच्या मते त्यांची संपत्ती ३६ कोटी असल्याचं सांगण्यात येतं.
'हवा हवाई', 'काटे नहीं कटते', 'मेरे हाथों में नौ चूड़ियाँ हैं', 'अलबेला साजन आयो रे', 'बरसो रे मेघा मेघा', 'मेहंदी लगाके रखना' अशा कितीतरी गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या सरोज खान यांचा कलंक चित्रपट अखेरचा ठरला.
करण जोहरच्या 'कलंक' या चित्रपटासाठी सरोज खान यांनी अखेरचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. 'तबा हो गई हे' त्यांचं अखेरचं गाणं ठरलं.