SEE PICS: deepika padukone reach at ranveer singh house for griha pravesh
SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:13 PM2018-11-18T13:13:19+5:302018-11-18T13:25:22+5:30Join usJoin usNext इटलीत लग्नविधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झालेत. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास लग्नविधी पूर्ण केला. तो म्हणजे, गृहप्रवेशाचा. होय, विमानतळावरून दीपिका थेट आपल्या सासरी पोहोचली. अख्खे भवनानी कुटुंब आपल्या नववधूच्या स्वागतासाठी हजर होते.रणवीरच्या घरी दीपिका नव्या नवरीसारखी पोहोचली. हातात मेहंदी, भांगात लाल चुटूक कुंकू, हातात लाल चुडा आणि सोबत कांजीवरमचा लाल रंगाची भरजरी शाल या पारंपरिक पोशाखातील तिचा लूक अतिशय खास होता. रणवीर सिंग पांढºया रंगाचा कुर्ता-पायजामा व सोबत पिंक कलरच्या जॅकेटमध्ये होता. विमानतळावर दीपिका व रणवीर यांना पाहताच मीडिया व चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी रणवीर पूर्णवेळ दीपिकाला सांभाळताना दिसला. विमानतळावरही दोघांनी चाहत्यांना अभिवादन केले. दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचे आई-बाबा व बहीण सगळे हजर होते. रणवीरच्या वडिलांनी फिल्मी अंदाजात दीपिकाचे सून म्हणून स्वागत के होते. ‘ये दीवानी तो भवनानी हो गई,’ असे ते म्हणाले होते. विमानतळावर दीपिका व रणवीर यांना पाहताच मीडिया व चाहत्यांनी एकच गर्दी केली. यावेळी दोघांच्या चेहºयावरचा आनंद बघण्यासारखा होता. यावेळी रणवीर पूर्णवेळ दीपिकाला सांभाळताना दिसला. विमानतळावरही दोघांनी चाहत्यांना अभिवादन केले गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेटॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंगDeepveerDeepika PadukoneRanveer Singh