रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:00 IST2021-12-07T19:00:00+5:302021-12-07T19:00:00+5:30
Ranu mondal: अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या.

सध्या राणू मंडल (ranu mondal) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन रातोरात राणू मंडल सुपरस्टार झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या नावाची चर्चा होत असते.
राणू मंडल यांना लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा है' या गाण्यामुळे खरी लोकप्रियता मिळाली.
एतिंद्र चक्रवर्ती या व्यक्तीने राणू मंडल यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.
हा व्हिडीओ पाहिल्यावर लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया याने राणू मंडल यांना त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली.
अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, राणू मंडल आणि बॉलिवूड याचा जवळचा संबंध आहे. राणू मंडल यांनी दिवंगत अभिनेता फिरोज खान यांच्या घरी घरकाम केलं आहे.
फिरोज खान यांच्या घरी राणू मंडल यांनी स्वयंपाक करण्यापासून ते साफसफाईपर्यंत सगळं घरकाम केलं आहे.
राणू मंडल त्यावेळीदेखील काम करतांना गाणी गुणगुणायच्या. त्यामुळे अनेकदा फिरोज खान यांनीही त्यांचं कौतुक केलं.
राणू मंडल यांचे पती, फिरोज खान यांच्याकडे कामाला होता. त्यांना मदत म्हणून राणूदेखील फिरोज खान यांच्याकडे घरकाम करायला जायच्या.
राणू जोपर्यंत मुंबईत राहत होत्या. तोपर्यंत फिरोज खान हे त्यांना शक्य होईल तितकी राणू व त्यांच्या पतीला मदत करायचे.