किस्सा : शूटिंग दरम्यान करीनाच्या हॉट सीनवरून भांडले होते शाहिद आणि फरदीन, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:11 PM2022-03-03T18:11:47+5:302022-03-03T18:20:08+5:30

Shahid Kapoor and Fardeen Khan Fight : शाहिद कपूर आणि फरदीन खान 'फिदा' सिनेमात एकत्र दिसले होते. इथून दोघांमधील वादाला सुरूवात झाली होती. चला जाणून घेऊ त्यांच्या वादाचा किस्सा...

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, बॉलिवूडचं नेहमीच वादांसोबत जवळचं नातं आहे. या इंडस्ट्रीत स्टार्स त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अफेअरपासून ते ब्रेअकपपर्यंत, सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणाने लाइमलाईटमध्ये राहतात. बॉलिवूड जेवढं मैत्रीसाठी ओखळलं जातं, त्यापेक्षा जास्त हे भांडणांसाठी प्रसिद्ध आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची भांडणं कधी कुणापासून लपलेली नाहीत. मग ते सलमान खान- शाहरूखमधील असो वा शाहिद कपूर आणि फरदीन खानमधील असो. शाहिद कपूर आणि फरदीन खान 'फिदा' सिनेमात एकत्र दिसले होते. इथून दोघांमधील वादाला सुरूवात झाली होती. चला जाणून घेऊ त्यांच्या वादाचा किस्सा...

'फिदा' सिनेमासाठी शाहिद कपूर आणि फरदीन खान यांना साइन करण्यात आलं होतं. या सिनेमाची हिरोईन होती करिना कपूर हा पहिला सिनेमा होता ज्यात शाहिद कपूर आणि करिना कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

या सिनेमात फरदीन खान आणि करिना कपूर यांच्यात एक हॉट सीन शूट होणार होता. यावेळी सेटवर शाहिद कपूरही उपस्थित होता. असं सांगितलं जां की, करिना आणि फरदीन यांच्या हॉट सीन दरम्यान शाहिद आणि फरदीन भांडण इतकं वाढलं की, दोन्ही स्टार्स आपसात भिडले. बऱंच समजावल्यानंतर दोघे शांत झाले होते.

एका मुलाखती दरम्यान फरदीन खानने सांगितलं होतं की, शाहिद आणि त्याच्यात जरा वाद होता. सोबतच तो म्हणाला होता की, आम्ही चांगले मित्र नाही आहोत. शाहिदसोबत माझं अजिबात पटत नाही, पण हे काही मोठं भांडण नव्हतं.

फरदीन शाहिद कपूरबाबत बोलला होता की, 'मी ऐकलं की, तो माझ्याबाबत उलटसुलट बोलत होता. जो एक बालिशपणा आहे. त्याला काही अडचणी होत्या. पण त्याला म्हणालो की, तू माझ्यासोबत बोलणं बंद कर'.

शाहिद कपूरनंतर करिना कपूरबाबत फरदीन खान म्हणाला होता की, 'करिना आणि तो चांगले मित्र आहे. दोघेही सोबत बराच वेळ स्पेंड करतात. दोघांना एकमेकांवर विश्वास आहे. पण आम्हाला दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही नाहीये'.

तेच निर्माता करण जोहरच्या शोमध्ये शाहिद ईशा देओलसोबत पोहोचला होता. या शोमध्ये शाहिद फरदीनसोबतच्या भांडणाबाबत बोलताना दिसला. शाहिद म्हणाला होता की, 'पर्सनली त्याच्यासोबत माझं काही भांडण नाही. पण त्याला काही अडचण होती तर त्याने कॉल करून वाद मिटवता आला असता. पण तो मीडियासोबत बोलला. आता मी यावर काय बोलणार'.

फरदीन खान बऱ्याच वर्षांपासून रूपेरी पडद्यापासून दूर आहे. करिना कपूर आणि शाहिद कपूर आजही इंडस्ट्रीत काम करत आहेत. शाहिदच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो लवकरच 'जर्सी' सिनेमात दिसणार आहे. यात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. तेच करिना कपूर 'लाल सिंह चड्ढा' मध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे.