"मला असं वाटलं की, मी संपलो..."; ब्रेकअपमुळे अभिनेता दुखावला, सेटवरच ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:00 PM2024-12-03T17:00:41+5:302024-12-03T17:19:34+5:30

आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा तो एका व्यक्तीला डेट करत होता आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यानंतर तो खूप खचला होता.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये त्याने चॉकलेट बॉय म्हणून इमेज तयार केली.

शाहिदच्या आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा तो एका व्यक्तीला डेट करत होता आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यानंतर तो खूप खचला होता.

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शाहिदने सांगितलं की, "मी फक्त एकदाच रडलो आहे. तेही जेव्हा कोणीतरी माझं हृदय तोडलं."

"मेकअप करणाऱ्याने माझा मेकअप केला आणि मी रडू लागलो. त्याने मला थांबवलं पण मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकलो नाही. मला असं वाटलं की, मी आता संपलो आहे."

"मी कामावरून कधी रडलो नाही. पण हो, माझं हृदय तुटल्यावर मी खूप रडलो आहे. समाजात असं दिसून आलं आहे की. पुरुषांकडून लोकांच्या अपेक्षा असतात."

"लहान वयातच आपल्याला शिकवलं जातं की, आपलं एक कुटुंब आहे आणि ते आपण जपलं पाहिजे. जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा मला वाटलं आता समाजात माझ्याबद्दल काय म्हटलं जाईल."

"पण मी स्वतःवर दडपण आणायला नको होतं. मी स्वतःला समजावून सांगायला हवं होतं. त्यावेळी मी स्वतःला थोडं रिलॅक्स करायला हवं होतं आणि अनावश्यक गोष्टींचा विचार करायला नको होता."

शाहिद कपूरने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत.

अभिनेता सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो. त्याने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्याला दोन गोंडस मुलं देखील आहेत.