8 वर्षांची झाली शाहिद कपूरची लाडकी लेक, मीशाच्या वाढदिवशी मीराने शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:50 PM2024-08-26T18:50:39+5:302024-08-26T19:04:27+5:30

शाहिद अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे मस्त फोटो शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.

Happy birthday Misha Kapoor : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira rajput) अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे

वयाच्या २१ व्या वर्षी मीरानं शाहिद कपूरशी लग्न केलं. दोघांच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला सोशल मीडियावर चाहत्यांचे खूप प्रेम मिळतं.

सोशल मीडियावर मीरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर एक वर्षानं २०१६ रोजी त्यांच्या आयुष्यात मीशा आली. २०१८ साली त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या झैनचं आगमन झालं.

त्यापैकी आज मीशाचा वाढदिवस आहे. शाहिद आणि मीरा यांची मुलगी मीशा ही आज ८ वर्षांची झाली आहे

मीरा राजपूतने तिच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

मीरा राजपूतच्या पोस्टवर अभिनेत्री अनन्या पांडे हिने कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्याचं नाव एकेकाळी शाहिदचा भाऊ ईशान खट्टरशी जोडलं गेलं होतं.

मीशाच्या जन्मानंतर शाहिदच्या आयुष्यात बरेच बदल झाले. नेहा धुपियाच्या शोमध्ये त्याने मीशाच्या जन्मानंतर स्मोकिंग सोडल्याचं सांगितलं होतं. मुलीच्या जन्मानंतर त्याने ही वाईट सवय सोडण्याचा निर्णय घेतला होता.

शाहिद अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे मस्त फोटो शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.