PHOTOS : अरे ये बंदी तो करिना से भी हॉट निकली...; मीरा राजपूतचा रॅम्प वॉकवर चाहते फिदा!! By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:31 AM 2022-03-27T11:31:38+5:30 2022-03-27T11:37:43+5:30
Mira Rajput at Lakme Fashion Week 2022 : मीराला रॅम्प वॉक करताना पाहून सगळ्यांनीच तिला दाद दिली. रॅम्पवरचा तिचा आत्मविश्वास पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. दोन मुलांची आई असलेली मीरा रॅम्पवर अगदी सहज वावरली. 2015 साली शाहिद कपूरने मीरा राजपूत नावाच्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मीरा कोण, कुठली हे तोपर्यंत कुणालाही माहित नव्हतं. बॉलिवूडच्या ग्लॅमर इंडस्ट्रीशी तिचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता.
पत्नी बनून मीरा शाहिदच्या आयुष्यात आली आणि अख्खी बदलली. अचानक लाईमलाईटमध्ये आली. आता तर मीरा राजपूतची स्वत:ची एक ओळख आहे. होय, स्टायलिश लुकमुळे ती सतत चर्चेत असते.
मीरा राजपूत नुकतंच लॅक्मे फॅशन वीक 2022 साठी शोस्टॉपर बनली होती. तिने डिझायनर आयशा रावच्या लेबलसाठी रॅम्प वॉक केला. यादरम्यान मीरा राजपूत रंगीबेरंगी ब्रालेट आणि लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
मीराला रॅम्प वॉक करताना पाहून सगळ्यांनीच तिला दाद दिली. रॅम्पवरचा तिचा आत्मविश्वास पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. दोन मुलांची आई असलेली मीरा रॅम्पवर अगदी सहज वावरली.
रॅम्पवरचे तिचे फोटो समोर आले आणि चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या. अरे ये बंदी तो करिना से भी हॉट निकली, अशा कमेंट्स काही चाहत्यांनी केल्यात.
चाहत्यांनी करिनासोबतच मीराची तुलना का केली असावी? हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कधीकाळी शाहिद करिनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. शाहिद व मीराचं लग्न झालं तेव्हाही मीरा व करिनाची अशीच तुलना झाली होती.
काही लोकांनी लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर मीराला पाहून तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. ती शो-स्टॉपर बनवणं काहींना रुचलं नाही.
हीच का? इतक्या पात्र मुली असताना हिलाच का शो स्टॉपर बनवलं गेलं? असा खोचक सवाल काहींनी केला. अर्थात या ट्रोल करणाºयांपेक्षा मीराचं कौतुक करणारे अधिक होते. मीराने 2015 मध्ये शाहिद कपूरशी लग्न केलं होतं आणि लग्न झाल्यापासून ती चर्चेत आली. मीरा नेहमीच तिच्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते