PICS : शमिता शेट्टी व राकेश बापटचा व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर साखरपुडा? अलिबागला होणार फंक्शन? By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 05:01 PM 2022-02-13T17:01:30+5:30 2022-02-13T17:09:55+5:30
Shamita Shetty - Raqesh Bapat : ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या एक दिवस आधी शमिता-राकेश कुटुंबासोबत अलिबागला रवाना झाल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडचं आणखी एक कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. होय, हे कपल म्हणजे शमिता शेट्टी व राकेश बापट.
उद्या व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर दोघं साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. कारण आहेत, दोघांचे फोटो.
होय, शमिता व राकेश अलीकडे मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अशात शमिता राकेश हे दोघं शेट्टी कुटुंबासह अलिबागला रवाना झालेत.
अलिबागला रवाना होत असतानाचे शमिता व राकेशचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोत शमिता शेट्टीसोबत तिची आई सुनंदा शेट्टीही दिसत आहे.
हे फोटो विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. शमिताची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या दोन मुलांसह अलिबागला रवाना झाली आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’ च्या एक दिवस आधी शमिता-राकेश कुटुंबासोबत अलिबागला रवाना झाल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिल्पा शेट्टी व्हाईट टी-शर्ट आणि स्किन कलरच्या पँटमध्ये मुलगी समिशाला घेऊन कॅमे-यासमोर पोझ देताना दिसली.