PHOTOS : हॉट अन् बोल्ड शनाया कपूरनं वेधल्या सर्वांच्या नजरा, ड्रेसची किंमत लाखाच्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:47 IST2024-12-12T13:37:12+5:302024-12-12T13:47:34+5:30

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर शनायाच्या मोठा चाहता वर्ग आहे.

कपूर घराण्यातील आणखी एक लाडकी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती आहे शनाया कपूर (Shanaya Kapoor).

अभिनेता संजय कपूर आणि महीप संधू यांची मुलगी शनाया कपूर कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर शनायाच्या मोठा चाहता वर्ग आहे.

स्टाइलच्या बाबतीत मोठ्या बहिणी सोनम कपूर, अशंला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यापेक्षा ती कमी नाही. शनाया कपूरचा प्रत्येक नवीन लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतो.

शनाया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करायला ती कधीच विसरत नाही.

आता शनायाने पुन्हा एकदा तिचा सिझलिंग लूक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतंच शनायाने व्हिक्टोरिया बेकहॅमचा हिरवा सॅटिन गाऊनमध्ये फोटोशूट केलं. याची किंमत तब्बल 1 लाख 15 हजार 323 रुपये आहे.

एका पेक्षा एक पोझ देत चाहत्यांना घायाळ केलं आहे. या फोटोंमध्ये शनाया तिची टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

रिपोर्टनुसार, शनाया कपूर लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

तिचे 'बेधडक' आणि 'आँखों की गुस्ताखियां' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.