Shefali Jariwala : 'कॉंटा लगा गर्ल' ला ओळखले का ? शेफालीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:06 IST2023-01-10T17:02:40+5:302023-01-10T17:06:48+5:30
'कॉंटा लगा गर्ल' शेफाली जरीवाला दिसते एकदम फिट. तिचा बिकीनी लुक पाहिलात का

२००२ मध्ये ‘कॉंटा लगा’ या गाण्याने शेफाली जरीवाला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर पोहोचली. होती सध्या तिचे सोशल मीडियावरील बोल्ड अॅंड ब्युटिफुल फोटो पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.
शेफाली अभिनयापासून लांब आहे मात्र तरी तिची चर्चा अधूनमधून सुरुच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे.
शेफालीचं वय ४० वर्षे आहे मात्र तिच्या फोटोंकडे बघून तिच्या वयाचा अंदाजही लागत नाही. बिकीनी असो किंवा स्कर्ट ती प्रत्येक लुकमध्ये फिट दिसते.
आता नुकतेच तिने गोवा हॉलिडेचे फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये तिचा हॉट अवतार बघायला मिळतो आहे. तिचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
काळया रंगाच्या बिकीनीमध्ये तिचा सेक्सी लुक बघायला मिळतोय. गोवा मोर्जिम बीच वरील तिचे हे फोटो आहेत.
2004 मध्ये शेफालीने मीत ब्रदर्समधील हरमीत सिंगशी लग्न केले होते. पण लग्नाच्या 9 वर्षानंतर शेफालीने हरमीतपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
या दोघांचं नातं वाईट पद्धतीने संपलं. त्यानंतर शेफालीने हरमीतवर गंभीर आरोप केले होते. या नात्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
शेफालीने तिचा पती 'पराग त्यागी' सोबतही फोटो पोस्ट केले आहेत. पराग आणि शेफालीने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. या कपलचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या शेफाली गोवा येथे व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. याआधी तिचे मालदिव्ह्ज चे फोटो खूप व्हायरल झाले होते.