Sidharth-Kiara Love Story: पार्टीतील ‘ती’ पहिली भेट, ब्रेकअप ते लग्न..., अशी सुरू झाली होती सिद्धार्थ कियाराची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 02:45 PM 2023-02-05T14:45:56+5:30 2023-02-05T14:59:10+5:30
Sidharth-Kiara Love Story: ‘शेरशाह’च्या सेटवर सिद्धार्थ व कियाराची लव्हस्टोरी सुरू झाली, असं म्हटलं जातं. पण असं नाहीये. त्याआधीच दोघांची भेट झाली होती... सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी उद्या ६ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे.
कियारा व सिद्धार्थ आपल्या कुटुंबासह जैसलमेरला पोहोचले आहेत. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
सिद्धार्थ व कियाराच्या अफेअरची दीर्घकाळापासून चर्चा होती. मात्र दोघांनीही दीर्घकाळ आपलं नातं जगापासून लपवून ठेवलं होतं.
या कपलची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
‘शेरशाह’च्या सेटवर सिद्धार्थ व कियाराची लव्हस्टोरी सुरू झाली, असं म्हटलं जातं. पण असं नाहीये. त्याआधीच दोघांची भेट झाली होती.
'कॉफी विद करण 7'मध्ये खुद्द कियाराने या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. तर २०१८ मध्ये कियारा व सिद्धार्थ पहिल्यांदा भेटले होते.
'लस्ट स्टोरीज'ची रॅप अप पार्टी होती. या पार्टीत दोघंही पहिल्यांदा भेटले. त्या रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या. कदाचित हीच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरूवात होती.
त्यानंतर काही वर्षांनी सिद्धार्थ आणि कियारा दोघांनी ‘शेरशहा’ हा एकत्र चित्रपट साईन केला. दोघेही आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र होतेच. चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली.
२०२० मध्ये दोघांनी न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. दोघांनीही वेगवेगळे फोटो शेअर केले होते. पण दोघांनीही एकत्र न्यू ईअर सेलिब्रेट केलं हे ओळखायला लोकांना वेळ लागला नाही.
यानंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या. रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये दोघांनी आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. अगदी हे नातं घरापर्यंत पोहोचलं.
यानंतर कियाराच्या आई-वडिलांनी सिद्धार्थच्या घरच्यांना जेवायला बोलावलं. यावेळी सिद्धार्थ आणखी कियारा एकमेकांच्या घरच्यांना भेटले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला संमती दर्शवली.
अर्थात इतकंच नव्हतं. याचदरम्यान अचानक सिद्धार्थ व कियाराच्या ब्रेकअपच्या बातम्याही कानावर आल्यात. अर्थात दोघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की सगळे गैरसमज दूर करत, दोघंही पुन्हा जवळ आलेत.
कियाराने भूल भुलैय्या २ साठी सिद्धार्थला फोन केला. यावेळी आपण दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची जाणीव दोघांना झाली आणि कियारा व सिड यांच्यात सगळं काही ठीक झालं. आता हे कपल लग्न करतंय.