Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:07 PM2024-10-10T12:07:00+5:302024-10-10T12:25:48+5:30

Kareena Kapoor : करीना कपूरने 'रिफ्युजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला आता चित्रपटसृष्टीत २५ वर्षे झाली आहेत.

करीना कपूरने 'रिफ्युजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला आता चित्रपटसृष्टीत २५ वर्षे झाली आहेत. पदार्पणापासूनच ती चित्रपटांमध्ये एक्टिव्ह आहे. तिचे असंख्य चाहते आहेत.

एका मुलाखतीदरम्यान करीना कपूरने तिच्या अभिनयाच्या दीर्घ प्रवासाबद्दल सांगितलं. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं तिच्यासाठी किती कठीण होतं हे तिने सांगितलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, "वयाच्या १७-१८ व्या वर्षी प्रत्येक चित्रपटात येण्याची इच्छा होती. जर तुम्ही एक दशक टिकून राहिलात, तर ते री-इन्वेन्शन आहे, जे पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत भीतीदायक आहे."

"गेल्या काही वर्षांत माझ्याशिवाय इतरही अनेक धाडसी अभिनेत्री आहेत ज्यांनी खूप प्रगती केली आहे. प्रत्येक पाच वर्षांनी मी स्वतःला विचारते, आता मी काय नवीन करू शकते?"

"हे केवळ यशस्वी चित्रपटांचा भाग बनण्याबद्दल नाही तर वारसा लाभल्याबद्दल आहे. मी अशा कुटुंबातून (कपूर कुटुंब) आले आहे, जिथे मला आव्हान दिलं गेलं आहे कारण ते सर्व अद्भुत अभिनेते आहेत."

"मला कुठेतरी माझा ठसा उमटवायचा आहे. दर दहा वर्षांत कोणी ना कोणी नवीन येतात, तर यामध्ये कशी टिकणार? अशा वेळी स्वत:ला यामध्ये टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. म्हणून मला वेगवेगळे पर्याय निवडायला आवडतात."

"मग ते बकिंघम मर्डर्स असो, सिंघम, क्रू किंवा या जाने जान हो असो, जे एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आलं आहे. मला वाटतं हे मोठ्या पडद्यावरही चांगली कामगिरी करतील."

करीना कपूर मर्डर-मिस्ट्री फिल्म 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण स्टारर हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.