"४७ लाखांना विकले माझे न्यूड व्हिडीओ", राखी सावंतचा आदिल दुर्रानीवर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:36 PM2023-08-24T17:36:41+5:302023-08-24T17:40:30+5:30

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतने एक्स पती आदिल खान दुर्रानीवर न्यूड व्हिडीओ बनवून विकल्याचा आरोप केला आहे.

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीसोबतच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आदिल आणि राखीने २०२२मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती आणि एप्रिल २०२३ मध्ये लग्नाची घोषणा केली होती. मात्र काही महिन्यांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी यायला सुरुवात झाली.

राखीने आदिलवर घरगुती हिंसा, एक्स्ट्र मॅरिटल अफेयर आणि काही धक्कादायक आरोप केले होते. राखी सावंतच्या तक्रारीनंतर आदिलला तुरुंगवास झाला होता. आता पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिल बाहेर आला आहे आणि पत्रकार, मुलाखतींमध्ये राखीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राखीवर काही धक्कादायक आरोप केले आहेत. दरम्यान आता, आदिलवर राखीने खळबळजनक आरोप केले आहेत.

बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतने दावा केला की, लग्नानंतर लगेच तिचा माजी पती आदिल खान दुर्रानीने तिचे न्यूड व्हिडीओ बनवले आणि ४७ लाखांना विकले.

राखीने हेदेेखील सांगितले की, आदिलने त्याच्या ईरानी गर्लफ्रेंडला सांगितले होते की, तो दुबईत खूप पैसे कमावेल आणि तिला मोठा फ्लॅट, कार आणि आणखी काही गिफ्ट देणार.

राखीने सांगितले की, "लग्नानंतर आदिल माझे न्यूड व्हिडिओ ४७ लाख रुपयांना विकत होता. लग्नानंतर तो दररोज माझे व्हिडिओ शूट करून विकत होता. आदिलने इराणी तरुणीला सांगितले की, तू माझे प्रेम आहेस आणि आता खूप पैसे येणार आहेत दुबईतून."

राखी सावंतने पुढे असाही दावा केला की आदिल खान दुर्रानीचा प्लान तिच्या आयुष्यात येण्याचा, लग्न करून तिला मारण्याचा होता. आदिलने एका ७५ वर्षीय महिलेलाही ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले. तिने सांगितले की, तो राखीच्या पाण्यात ड्रग्ज मिसळत असे जेणेकरून तो तिचा न्यूड व्हिडिओ बनवू शकेल.

राखी म्हणाली, "आदिलचा माझ्या आयुष्यात येण्याचा, माझ्याशी लग्न करण्याचा, मला मारण्याचा प्लान होता. माझ्याकडे तसा पुरावाही आहे. त्याने इतर काही मुलींना इराणी मुलगी आणि मला त्याची पत्नी म्हणून सांगितले. आमच्यापैकी एक ७५ वर्षांची महिला होती.

तिने मला सांगितले की आदिलने तिला पाण्यात मिसळून काहीतरी दिले. त्यानंतर तिचे न्यूड व्हिडीओ बनवले. तिलादेखील त्याने सोडले नाही, पण तो व्हिडीओ त्याने विकला नाही, तो फक्त तिला ब्लॅकमेल करायचा. हळू हळू तो मला मारायला लागला, माझा छळ करायचा. माझे कपडे फाडणे आणि सायकोसारखा वागत होता.

राखी सावंतने आदिल खान दुर्रानीवर बलात्काराचा आरोप केला होता. अभिनेत्रीने सांगितले की तिला म्हैसूरला जायचेही नव्हते. तिने खुलासा केला की ती म्हैसूरमध्ये असताना आदिलच्या ओळखीचा एक मुलगा आला आणि जबरदस्तीने त्यांच्या खोलीला कुलूप लावले. आदिलने ३ तास बंद खोलीत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचेही अभिनेत्रीने म्हटले आहे.