"पैसे कमी पडले होते का ? पडदेच गुंडाळून घेतले", अतरंगी ड्रेसमुळे सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:09 PM2021-10-06T14:09:59+5:302021-10-06T14:17:36+5:30

सोनम कपूर बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानली जाते. प्रत्येक इव्हेंट आणि पार्ट्यांमध्ये तिचे ड्रेसिंग खूपच वेगळे असल्याचे पाहायला मिळते. याच कारणामुळे सोनम नेहमीच तिच्या लूकबद्दल चर्चेत असते. मात्र,अलीकडेच सोनम कपूरने असा काही अतरंगी ड्रेस परिधान केला की चाहतेही हैरान झालेत.

एकीकडे काही चाहते सोनमच्या हटके ड्रेसिंग स्टाईलची कौतुकही करत आहेत.

तर काही चाहते तिच्या या लूकमुळे तिला प्रचंड ट्रोलही करत आहेत.

सोनम कपूरने लंडनमध्ये एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती.

खास या पार्टीसाठी सोनमने कफ्तान गाऊन सारखा ड्रेस परिधान केला होता.

हा क्रीम रंगाचा ड्रेस डिजाइनर रोकसेंडा इलिंसिकच्या ऑटम विंटर 2021 कलेक्शनधला आहे.

तिचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांच्या नजरा या फोटोवर खिळल्या.

सोनमचे कौतुक करणे तर सोडाच तिच्यावर मजेशीक कमेंट्स करत खिल्ली उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

एका युजरने म्हटले की,आता सुपरमॅन काय घालणार ? तर एकाने लिहीलंय की, रणवीरला माहिती पडले ना तर तो हा ड्रेस घ्यायला येईल.

सोनमला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.

ट्रोलिंगचा सोनमलाही फारसा काही फरक पडत नाही.