Sonali Sood Car Accident: कारचा चेंदामेंदा, एअरबॅग्जमुळे वाचली, सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:09 IST2025-03-25T17:37:54+5:302025-03-25T18:09:04+5:30
Sonu Sood's Wife Car Accident: सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर (Sonu Sood Wife Accident In Nagpur) मोठा अपघात झाला आहे.
सोनेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघाताचे फोटो समोर आलेत.
एका ट्रकला गाडी मागून धडकल्याने हा मोठा अपघात झाला. यात कारचे बोनेट पुर्णत: चेंदामेंदा झालं.
गाडीच्या झालेल्या अवस्थेवरुन अपघाताची भीषणता लक्षात येतंय. गाडीचा पुर्ण चक्काचूर झाला आहे.
पण, कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे सोनूची पत्नी वाचली आहे. सध्या ती रुग्णालयात डॉक्टारांच्या देखरेखीखाली आहे.
अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये सोनूची पत्नी सोनाली, तिची बहीण आणि तिच्या बहिणीचा मुलगा होता, अशी माहिती आहे.
सोनू सूदला अपघाताविषयी कळताच तो तातडीने मुंबईहून नागपूर पोहोचला आणि रुग्णालयात पत्नीची भेट घेतली.
एवढ्या मोठ्या अपघातामधून पत्नी वाचल्यानंतर सोनू सूदने देवाचे आभार मानले. त्याने म्हटलं, "साई बाबांच्या कृपेने कोणताही मोठा अनर्थ घडला नाही".
सोनू व सोनाली यांचं लग्न १९९६ मध्ये झालं होतं. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.
सोनाली अभिनयासोबतच सोनूसोबत सामाजिक कार्यात देखील पुढे असते.