'सूर्यवंशम'मधील भानुप्रतापचा नातू आता काय करतो? १२ वर्षांनी 'या' सिनेमातून केलं कमबॅक
By देवेंद्र जाधव | Updated: April 16, 2025 14:57 IST2025-04-16T13:50:05+5:302025-04-16T14:57:49+5:30
'सूर्यवंशम' सिनेमात ठाकूर भानुप्रतापचा नातू साकारणाऱ्या अभिनेत्याने या सिनेमातून १२ वर्षांनी कमबॅक केलं आहे, जाणून घ्या

'सूर्यवंशम' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस आढळणार नाही. 'सूर्यवंशम' सिनेमा आजही सेट मॅक्सवर दर रविवारी आवर्जुन पाहिला जातो.
'सूर्यवंशम' सिनेमात ठाकूर भानुप्रताप यांच्या नातवाची भूमिकाही चांगलीच गाजली. बालकलाकार आनंद वर्धनने ही भूमिका साकारली होती.
आनंदला या एका सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली. आजोबांना खीर देणारा निरागस नातू म्हणून आजही आनंद वर्धनला ओळखलं जातं.
आनंद वर्धन या सिनेमानंतर अभिनयक्षेत्रात इतका दिसला नाही. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं. पण आता १२ वर्षांनी आनंद पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करतोय.
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'निदुरिंचु जहापाना' या तेलुगू चित्रपटात आनंदने मुख्य भूमिका साकारली. आनंदच्या या रोमँटिक सिनेमाचं चांगलंच कौतुक झालं.
२००४ नंतर आनंदने अभिनयातून विश्रांती घेतली. त्याने हैदराबाद येथील CMR College of Engineering & Technology, हैदराबाद येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंगमध्ये B.Tech चं शिक्षण पूर्ण केलं.
'सूर्यवंशम' या १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अर्थात आनंदने साकारलेली 'सोनू'ची भूमिका खूप गाजली.