"जेव्हा आजारी असते तेव्हा..."; नागा चैतन्यने सांगितल्या शोभितासोबतच्या नात्यातील गमतीजमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:27 IST2025-03-21T16:13:12+5:302025-03-21T16:27:53+5:30
Naga Chaitanya And Sobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण जास्त रोमँटिक आहे?

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनीही व्होग इंडियाशी संवाद साधला. व्होगने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये नागा चैतन्यला विचारलं की चूक नसतानाही कोण माफी मागतं? यावर शोभिता म्हणाली की तो स्वतः आधी माफी मागतो.
शोभिताला थांबवत अभिनेत्याने उत्तर दिलं की, शोभिता सॉरी आणि थँक्सवर विश्वास ठेवत नाही. पत्नीच्या विचित्र सवयी कोणत्या आणि चांगलं काय वाटतं? याबद्दल विचारलं असता, नागाने सांगितलं की शोभिताला विचित्र सवयी आहेत.
शोभिता गमतीने म्हणाली की त्याला त्या आवडतात. कोण चांगलं जेवण बनवतं आणि आवडता पदार्थ कोणता असं विचारले असता, नागा चैतन्यने दोघांपैकी कोणीही स्वयंपाक करत नाही असं सांगितलं
जेव्हा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण जास्त रोमँटिक आहे, तेव्हा दोघांनीही सांगितलं की अभिनेता जास्त रोमँटिक आहे तर शोभिता प्रेरणादायी आणि मजेदार गोष्टी बोलते.
नागाने असंही सांगितलं की, शोभिताला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही. ती गाडी चालवत नाही.
चित्रपटांबद्दल विचारलं असता, नागा चैतन्य म्हणाला की, शोभिताला चित्रपट पाहण्याची गरज आहे. त्यावर शोभिताने तुझ्याच चित्रपटांपासून सुरुवात करेन असं सांगितलं.
आजारी असताना कोण जास्त नाटकं करतं असं विचारलं असता, दोघांनीही एकमेकांचं नाव घेतलं. शोभिता म्हणाली की ती जास्त आजारी पडते पण नागा जास्त नाटकं करतो. "जेव्हा ती आजारी असते तेव्हा बेशुद्ध पडते" असं अभिनेत्याने म्हटलं आहे.
भांडण झालं की कोण जिंकतं? यावर शोभिताने नागा चैतन्य जिंकतो असं उत्तर दिलं.
अभिनेत्याने खुलासा केला की, रिलेशनशिपमध्ये एकेकाळी, शोभिताला सर्व हिट गाण्यांचे हुक स्टेप्स शिकवण्याची आवड होती.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे लग्न गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झाले. नागा चैतन्यचं याआधी समंथाशी लग्न झालं होतं. २०२१ मध्ये दोघेही वेगळे झाले.