चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:56 PM2024-05-02T17:56:20+5:302024-05-02T17:59:50+5:30

Janhavi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बालपणीचं घर भाडेतत्वावर देते आहे. हे घर चेन्नईत असून तिच्यासाठी आणि तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसाठी खूप खास आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बालपणीचं घर भाडेतत्वावर देते आहे. हे घर चेन्नईत असून तिच्यासाठी आणि तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसाठी खूप खास आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचा Airbnbच्या जगभरातील ११ आयकॉन्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात अभिनेत्रीने तिचे चेन्नईतील आलिशान बंगला रेंटवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईतील या आलिशान बंगल्यात राहायला येणाऱ्या गेस्टसाठी १ बेडरूम आणि बाथरूमची सुविधा मिळणार आहे. १२ मे पासून या घराची बुकिंग मिळेल. या घरात जे गेस्ट राहतील त्यांना साउथ इंडियन फूडदेखील एन्जॉय करता येणार आहे.

चेन्नईतील हा बंगला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसाठी कोणत्या स्वप्नातील महालापेक्षा कमी नव्हता. कारण हे घर श्रीदेवीने बोनी कपूर यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर विकत घेतला होता.

वन नाइट स्टेसाठी आलेल्या पाहुण्यांना जान्हवी कपूरचे ब्युटी सीक्रेटही समजणार आहेत, जे तिला आई श्रीदेवीकडून मिळाले आहेत. जान्हवीने एयरबीएनबीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चेन्नईतील या घरात तिचं बालपण गेलं आहे.

जान्हवीची ड्रेसिंग रुमही पहायला मिळेल. तिथे ती नैसर्गिक त्वचेसाठी ट्रीटमेंट घेते. घराला हवेशीर मास्टर बेडरुम आहे. घराच्या मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे. तिथे पाम ची झाडं आणि कारंजे आहेत

एक महागडा स्विमिंग पूल आहे. एकूणच हा एक हवेशीर सेटअप आहे आणि रिलॅक्स होण्यासाठी तसंच मोकळ्या हवेत सूर्यास्त पाहण्यासाठी एक सुंदर जागा आहे.

जान्हवी सांगते की, चेन्नईच्या घरात माझ्या कुटुंबाबरोबर घालवलेले क्षण ही माझ्यासाठी उन्हाळ्याची एक रम्य आठवण आहे. ही जागा मला कायमच एखाद्या अभयारण्यासारखी वाटत आली आहे. हे सगळं मला माझ्या फॅन्सबरोबर शेअर करायचं आहे म्हणून मी माझ्या घराचे दरवाजे एअरबीएनबीच्या माध्यमातून उघडले आहेत. आमच्या कुटुंबाच्या काही पारंपरिक गोष्टी पाहुण्यांबरोबर शेअर करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. त्यामुळे पाहुण्यांना कपूर घराण्यासारखा या जागेचा आनंद घेता येईल.

पूलजवळ बसून चिल करणे, योगा, माझ्या आईच्या नॅचरल स्कीन केअर रेसिपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आठवणी तयार करणे हे सगळं इथे येणारे गेस्ट करू शकतील. एअरबीएनबीच्या आयकॉन प्रवर्गात माझा समावेश केल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास मी आतूर आहे, असं जान्हवी कपूर म्हणाली.