लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 02:00 PM2024-07-22T14:00:12+5:302024-07-22T14:13:03+5:30

'स्त्री' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसवर खास फोटोशूट करुन चाहत्यांना प्रश्न विचारलाय (shraddha kapoor)

श्रद्धा कपूर-राजकुमार रावच्या आगामी 'स्त्री २'ची उत्सुकता शिगेला आहे

'स्त्री २' मध्ये श्रद्धा पुन्हा एकदा तिच्या गाजलेल्या कॅरेक्टरमध्ये चंदेरी गावाला वाचवायला येणार आहे

'स्त्री २' च्या प्रमोशननिमित्तान श्रद्धा विविध ठिकाणी लाल रंगाच्या साडी परिधान करुन इव्हेंटला जाताना दिसतेय

श्रद्धा कपूरने नुकतंच लाल रंगाच्या ड्रेसवर हॉट फोटोशूट केलेलं दिसलं. लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? असा प्रश्न श्रद्धाने फॅन्सना विचारलाय

श्रद्धा कपूरने विचारलेल्या प्रश्नावर अनेकांनी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तुच सुंदर दिसतेस अशा कमेंट केल्या आहेत

श्रद्धा कपूरने फोटोसाठी मनमोहक पोज देत सर्वांना घायाळ करुन सोडलंय

श्रद्धा कपूरने स्त्री २ च्या प्रमोशनला खास वेणी बांधत लाल रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं होतं

श्रद्धा कपूरचा हा पारंपरिक अंदाजा बघत तिच्या चाहत्यांनी तिला पसंती दिली. याशिवाय तिच्या फोटोंवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला