गे असल्याचं सांगत बायकोने दिला घटस्फोट, जॅकी श्रॉफच्या पत्नीला डेट करत असल्याची पसरवली अफवा, कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:23 PM2024-10-14T16:23:34+5:302024-10-14T16:29:43+5:30

असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे काही सिनेमे करून नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेले. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता साहिल खान.

असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे काही सिनेमे करून नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेले. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता साहिल खान.

स्टाइल सिनेमातून प्रसिद्धीझोतात आल्यानंतर साहिल खान अनेक सिनेमांमध्ये दिसला. पण, स्टाइल नंतर मात्र त्याची जादू फिकी पडली.

साहिलने एक्सक्यूज मी, ये है जिंदगी, डबल क्लास, अलादिन अशा सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण, बॉलिवूडमधील करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळेच तो जास्त चर्चेत होता.

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात साहिलचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटकही केली होती.

साहिलने अभिनेत्री नेगर खान हिच्याशी विवाह केला होता. मात्र अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला.

साहिल गे असल्याचं सांगत अभिनेत्रीने त्याला घटस्फोट दिला होता. पण, साहिलने मात्र हे सत्य नसल्याचं सांगितलं होतं.

जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा यांच्याबरोबर साहिल बिजनेसमध्ये उतरला होता. तेव्हा त्या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

पण, हे खोटं असून साहिलनेच या अफवा पसरवल्याचं आयेशा श्रॉफ यांनी म्हटलं होतं. त्यांनी मानहानी आणि बिजनेसमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करत साहिलविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.

सध्या साहिल सिनेसृष्टीपासून दूर असून त्याची स्वत:ची जीम आहे. यातून तो बरेच पैसे कमावतो. त्याचं युट्यूब चॅनेल देखील आहे.