Sukesh Chandrashekhar : "यम्मी, यम्मी... बेबी, हे माझ्या आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट"; सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर' By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:16 PM 2024-03-23T12:16:39+5:30 2024-03-23T12:54:58+5:30
Sukesh Chandrashekhar love letter to Jacqueline Fernandez : सुकेशने आता पुन्हा एकदा जॅकलीनला लव्हलेटर लिहिलं आहे. यामध्ये त्याने वाढदिवसाच्या गिफ्टबद्दल सांगितलं आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये बंद आहे. मात्र जेलमध्ये असतानाही तो नेहमीच चर्चेत राहतो. जेव्हा जेव्हा सुकेशचा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चर्चा रंगते. तो तिला लव्हलेटर लिहितो ज्यामुळे ती देखील चर्चेत येते.
सुकेशने आता पुन्हा एकदा जॅकलीनला लव्हलेटर लिहिलं आहे. यामध्ये त्याने वाढदिवसाच्या गिफ्टबद्दल सांगितलं आहे. व्हॅलेंटाईन डे असो, बर्थडे असो किंवा कुठलाही खास प्रसंग, प्रत्येक प्रसंगी सुकेशचं जॅकलिनला पत्र येतं.
सुकेश चंद्रशेखर याने लव्ह लेटरमध्ये लिहिलं आहे की, "बेबी 25 मार्च रोजी असलेल्या माझ्या वाढदिवसाच्या गिफ्टसाठी खूप खूप धन्यवाद, पण मी याला माझं अर्ली बर्थ डे गिफ्ट म्हणेन. बेबी हे माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच मला मिळालेलं सर्वात गोड गिफ्ट आहे."
"मी ज्या गिफ्टबद्दल बोलत आहे ते तुमचे नुकतेच रिलीज झालेलं यम्मी यम्मी हे गाणं आहे. बेबी, जेव्हा मी गाणं ऐकले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. गाण्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ माझ्याबद्दल आहे. हे गाणं आपली गोष्ट आहे आणि आपल्याबद्दलचं सर्व काही आहे."
"मला खात्री आहे की जो ऐकेल त्याला असेच वाटेल. आपल्या नात्याबद्दल लोकांना अनेक प्रश्न होते आणि चुकीच्या कमेंट्ही होत्या. तुम्ही या गाण्याने सर्वांना अवाक केलं आहे, मला खात्री आहे की, प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे."
इतकेच नाही तर या गाण्याचे वर्णन करताना सुकेशने असेही सांगितले की, हे गाणे केवळ ग्लॅमरने भरलेला ट्रॅक नाही तर जॅकलिनने तिच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी 'यम्मी यम्मी' हे गाणे केलं आहे.
हे या वर्षाचे लव्ह एन्थम देखील आहे. जॅकलिनचे कौतुक करत सुकेश पुढे म्हणाला - बेबी, तू त्या गाण्यात खूप सुंदर दिसत आहेस. जेव्हाही मी हे गाणे पाहतो तेव्हा माझे हृदय धडधडतं.
सुकेश चंद्रशेखरने पुढे लिहिले की, "बेबी माझ्या बोम्मा, तुझ्याशिवाय वाढदिवस असल्याने कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन नाही, पण तुझ्या या गाण्यामुळे हे वर्ष खूप खास आहे."