taapsee pannu birthday special see her then and now pics
SEE PICS : कधी काळी लोक म्हणायचे ‘बॅड लक हिरोईन’, इतक्या वर्षांत इतकी बदलली तापसी पन्नू By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:00 AM2020-08-01T08:00:00+5:302020-08-01T08:00:02+5:30Join usJoin usNext आज तापसीचा वाढदिवस आज ती बॉलिवूडची टॉप लीड अॅक्ट्रेस आहे. अपार कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये असे काही यश मिळवले की ‘बॅड लक हिरोईन’ म्हणणा-यांची तोंड बंद झालीत. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याबद्दल. आज तापसीचा वाढदिवस. 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीमध्ये तापसीचा जन्म झाला. पंजाबी घरात जन्मास आलेल्या तापसीने 2010 मध्ये ‘झुम्माण्डि नादां’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. पण करिअरच्या सुरुवातीला तिला बºयाच वाईट अनुभवातून जावे लागले. एक वेळ अशी आली की लोक तिला‘बॅड लक हिरोईन’ म्हणू लागले. कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करुन तापसी पॉकेट मनी कमवत होते. कॅट परिक्षेत 88% मिळवल्यानंतर एमबीए करण्याच्या विचारात असताना तिला अचानक सिनेमाची ऑफर आली. तिने ही ऑफर स्वीकारली. पण तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतरचे सलग दोन सिनेमेही आपटले. यानंतर सर्वच मला ‘बॅड लक हिरोईन’ समजू लागले. तापसीला सिनेमात घेतले की चित्रपट फ्लॉप होईल, या भीतीने अनेकांनी तिला काम देण्यास नकार दिला. या टॅगमुळे कुठलाही अभिनेता, दिग्दर्शक-निर्माता तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. एका निर्मात्याने तर एका सिनेमासाठी तिचे नाव फायनल केले, शूटिंगच्या तारखाही ठरवल्या. पण ऐनवेळी तिला काढून एका मोठ्या हिरोईनला कास्ट केले. वयाच्या आठव्या वर्षांपासून तापसीने कथ्थक आणि भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.तापसी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिने सहा महिने नोकरी केली. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. मॉडेलिंग करत असताना तिला तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली. कानामागून आली अन् तिखट झाली, ही म्हण बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला अगदी योग्यरित्या लागू पडते. पाहता पाहता बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना हेवा वाटावा, असेच काही तापसीने केलेय. होय, मागच्या वर्षभरात तिचे एक-दोन नाही तर 5 सिनेमा रिलीज झालेत आणि यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली. विशेष म्हणजे स्वत: तापसी मात्र याबाबत अजिबात कल्पना सुद्धा नव्हती. एका मीडिया रिपोर्टवरून ही गोष्ट समजली त्यावेळी ती स्वत:ही हैराण झाली. गतवर्षी तापसीचे मिशन मंगल, गेम ओव्हर, बिल्ला, सांड की आंख असे चार सिनेमे रिलीज झाले होते. तर थप्पड हा याचवर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. तापसीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर तिच्याकडे रॉकेट रश्मी आणि हसीन दिलरुबा असे अनेक चित्रपट आहेत.टॅग्स :तापसी पन्नूTaapsee Pannu