Tamanna Bhatia finally spoke about the intimate scene says he made me very comfortable
तमन्ना भाटिया अखेर इंटिमेट सीनबद्दल बोललीच, म्हणाली- "त्या अभिनेत्याने मला खूप..." By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:47 PM2023-06-23T12:47:48+5:302023-06-23T13:17:42+5:30Join usJoin usNext Lust Stories 2 Tamanna Bhatia बॉलिवूडमध्ये आता एका नव्या कपलची चर्चा आहे. विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) यांचीही जोडी असेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. पण होय दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं स्वत: तमन्नाने सांगितलंय तमन्ना आणि विजय आगामी 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमात स्क्रीनशेअर करत आहेत. यात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. याच सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली. सिनेमात इंटिमेट सीन्स देताना विजयने खूप कंफर्टेबल केल्याचं तमन्ना म्हणाली. 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये चार दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या कहाण्या दाखवल्या आहेत. तमन्नाने इंडस्ट्रीत आल्यापासूनच ऑनस्क्रीन इंटिमेट सीन्स देणार नाही असा निर्णय घेतला होता. मात्र नुकतंच तिने 'जी करदा' या वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स करत नो किसींग पॉलिसी मोडली. आता 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल तमन्ना म्हणाली,'मी कधीच कोणत्याही अभिनेत्यासोबत इतकी कंफर्टेबल झाले नव्हते. खरं तर असे सीन्स करताना सुरक्षित वाटणं एखाद्या कलाकारासाठी खूप आवश्यक आहे. माझ्यासाठी अशी फिल्म करणं कठीण होतं पण विजयमुळे मी काहीही बोलायला आणि करायला तयार होते.' तमन्नाने बॉयफ्रेंड आणि सहकलाकार विजय वर्माच्या कामाची स्तुतीही केली. विविधांगी भूमिका करण्यासाठी विजय वर्मा लोकप्रिय आहे. त्याचं हेच टॅलेंट तमन्नाला फार आवडतं. ती म्हणाली,'मी विजयचे आधीचे परफॉर्मन्स पाहिले आहेत. या प्रोजेक्टमधून काही नाही झालं तरी मला विजय कडून खूप शिकायला मिळेल. म्हणूनच मी या सिनेमात काम करायचं ठरवलं.' तमन्ना भाटियाने विजय सोबतच्या नात्याला दुजोरा देत तो माझी हॅपी प्लेस असल्याचं सांगितलं होतं. तसंच दोघंही गोव्याला एकत्र असताना किस करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर दोघंही अनेकदा डेटवर एकत्र दिसले होते. 'जी करदा' वेबसिरीजमध्येही तमन्नाने इंटिमेट सीन्स दिले आहेत. यावर ती म्हणाली,'असे सीन्स कोणाला आकर्षित करण्यासाठी नसतात. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप ड्रामा पाहत असता तेव्हा इंटिमेट सीन्स महत्वाचा भाग बनतात. कोणाला आवडो ना आवडो हे असंच आहे.'टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडरिलेशनशिपTamannaah Bhatiabollywoodrelationship