Tamannaah Bhatia : "आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:22 AM2024-09-12T10:22:26+5:302024-09-12T10:39:32+5:30

Tamannaah Bhatia : अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

'स्त्री 2' मधील तमन्ना भाटियाचं 'आज की रात' हे गाणं सध्या धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

तमन्ना म्हणाली की, "मला आई होण्याची, मुलं होण्याची भीती वाटते. मी एखाद्याला इतकं प्रेम आणि इतकी काळजी कशी देऊ शकते असा विचार मनात येतो."

"माझ्या आई-वडिलांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवलं आहे की, त्यांनी यामध्ये पदवी घेतल्यासारखं वाटतं."

"म्हणूनच मला आता मुलं होण्याची खूप भीती वाटते. मी ही लेव्हल कशी गाठू शकेन, वाढवू शकेन असा प्रश्न नेहमीच मला पडतो."

तमन्नाने आपल्या मनातील भावना आता व्यक्त केल्या आहेत. मात्र लग्नानंतर तिचा आई होण्याचा निर्णय बदलतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अभिनेत्री सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. दोघांनीही आपलं रिलेशन पब्लिक केलं आहे. त्यांच्या रिलेशनची नेहमीच जोरदार चर्चा रंगते.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या अदांनी ती सर्वांनाच घायाळ करते.