राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:35 IST2024-08-23T17:07:30+5:302024-08-23T17:35:26+5:30
जन्माष्टमी जवळ येताच तमन्ना राधासारखी सजली. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनं जन्माष्टमीच्या पुर्वी एक खास मनमोहित करणारे फोटोशुट केलं आहे.
जंगलात एका झाडाखाली कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधाच्या रुपात तमन्ना खुपच सुंदर दिसतेय.
कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरून केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
राधा आणि कृष्ण यांच्यातील दैवी प्रेमाची झलक तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
तमन्ना भाटिया गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
तमन्ना इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरुन नजर हटत नाहीये.
श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तमन्नाच्या हाता मोरपंख दिसत आहे.
तमन्ना भाटियाने पायात सुंदर पैजण घातले. तर तिच्या हातात मोरपंख असून ती सुंदर पोझ देत आहे.
प्रसिद्ध डिझायनर तौरानीने जन्माष्टमीपूर्वी राधा-कृष्णाच्या कथेवर त्यांचे नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे. त्याच्यासाठी तमन्नाने हे फोटोशुट केलं आहे.