IN PICS : भावा तुला सरकारी नोकरी आहे का रे? रोमॅन्टिक फोटो शेअर करताच साऊथचं जोडपं झालं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 05:02 PM2023-01-15T17:02:45+5:302023-01-15T17:16:09+5:30

गेल्यावर्षी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी ( Mahalakshmi ) हिने निर्माता रवींद्र चंद्रशेखरन ( Ravindar Chandrasekaran) सोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या ४ महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे...

गेल्यावर्षी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी ( Mahalakshmi ) हिने निर्माता रवींद्र चंद्रशेखरन ( Ravindar Chandrasekaran)सोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे.

आता लग्नाच्या ४ महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कपलने एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला व अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.

रवींद्र चंद्रशेखरन यांनी लग्नाला ४ महिने पूर्ण झाल्यानिमित्त महालक्ष्मीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो हा माझा आनंद नाहीये तर तू माझ्यासाठी जगतेयस हा माझा आनंद आहे, असं त्यांनी या फोटोसोबत लिहिलंय.

पण रवींद्र यांची पोस्ट अन् त्यांनी शेअर केलेला फोटो लोकांच्या पचनी पडला नाही. मग काय अनेकांनी यावरून या कपलला ट्रोल करायला सुरूवात केली.

अनेकांनी महालक्ष्मीच्या पतीच्या दिसण्यावरून नको त्या कमेंट्स केल्या. महालक्ष्मी सारख्या इतक्या सुंदर अभिनेत्रीने रवींद्रसोबत लग्न केलंच कसं? असा सवाल अनेकांनी केला.

काहींनी महालक्ष्मीवर पैशासाठी लग्न केल्याचा आरोपही केला. पैशापुढे सगळं झूठ आहे, अशा कमेंट्स करत लोकांनी तिला ट्रोल केलं.

भावा तुला सरकारी नाेकरी आहे का? पैसा आहे तर सगळं काही शक्य आहे. पैसा बोलतो, अशा कमेंटस काही युजर्सनी केल्यात.

महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. महालक्ष्मी ही तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. व्हिडीओ जॉकी म्हणून तिने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

वाणी रानी, चेल्लामय, अरसी, थिरू मंगलम, यामिरूक्का बयामेन अशा अनेक चित्रपटांत महालक्ष्मी झकळली.

महालक्ष्मीचा पती रवींद्र चंद्रशेखरन तमिळ निर्माता आणि दिग्दर्शक आहे. नालनम नंदिनीयम, सुट्टा कधई, मुरुंगकाई चिप्स अशा अनेक चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे.