The Kapil Sharma Show: '... म्हणून मी कपिलचा शो सोडला, आमचं भांडण नव्हतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:27 PM2022-03-02T16:27:38+5:302022-03-02T16:35:52+5:30

मला कलर्स टीव्हीसोबत काम करावे लागले. त्यातूनच, मी कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये काम करू शकले नाही, असे उपासना सिंह यांनी सांगितले.

कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान काही वाद झाला, तेथूनच अनेक कलाकारांनी हा शो सोडला.

त्यामध्ये, अली अजगर, सुनिल ग्रोव्हर आणि कपिलच्या आत्याची भूमिका निभावणाऱ्या उपासना सिंहनेही कपिलच्या शोला रामराम केला होता. त्यानंतर, कपिलने पुन्हा नव्या दमाने हा द कपिल शर्मा शो... या नावाने हा कॉमेडी शो सुरू केला.

मात्र, कपिलसोबत भांडण झाल्यानेच उपासना सिंहने हा शो सोडल्याची चर्चा होती. आता, याबाबत स्वत: उपासना सिंहने स्पष्टीकरण दिलं आहे.

कपिलसोबत आजही माझं नातं अतिशय चांगलं आहे. द कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो मी सोडला. मात्र, कपिलसोबत वाद झाल्यामुळे मी तो शो सोडला नसून कपिलने चॅनेल बदलल्यानेच मी ह्या शोमधून बाहेर पडले.

कारण, अगोदर कपिलचा शो कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होत होता. मात्र, काही दिवसांच्या गॅपनंतर कपिलने ह शो सोनी टिव्हीसोबत करार करून तेथे सुरू केला. वास्तविक माझे कलर्स टीव्हीसोबत काही करार होते.

त्यामुळे, मला कलर्स टीव्हीसोबत काम करावे लागले. त्यातूनच, मी कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये काम करू शकले नाही, असे उपासना सिंह यांनी सांगितले.

आपण कपिल शर्मासोबत काम करायला तयार आहोत, पण त्यासाठी एखादं चांगलं कॅरेक्टर मिळायला हवं.

कपिलसोबत मी काही भाग केले, पण काही मिनिटांसाठी त्याच्या शोचा भाग बनण्यापेक्षा क्रिएटीव्ह रोलने काहीतरी आनंदी काम करावं, याची मला जाणीव झाल्याचं उपासना सिंह यांनी म्हटलं.

कपिलच्या शोमध्ये उपासना सिंह यांचं कॅरेक्टर हे बुआ नावाने प्रसिद्ध झालं होतं, या बुआला लोकांची चांगली पसंती मिळत होती