IN PICS : बक्कळ कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकारांनी किती फी घेतली माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:27 PM 2022-03-23T12:27:19+5:30 2022-03-23T12:33:12+5:30
The Kashmir Files: ‘द कश्मीर फाइल्स’ या सुपर सक्सेसफुल चित्रपटाच्या कमाईबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. पण या चित्रपटातील कलाकारांनी सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? 2022 चा ‘मास एंटरटेनर’ चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’नं कमाईचे एक ना अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. कमी बजेटचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतकी बक्कळ कमाई करेल, अशी कल्पनाही केली नव्हती. पण देशभर या चित्रपटाची चर्चा रंगली आणि माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमानं गर्दी खेचली. या सुपर सक्सेसफुल चित्रपटाच्या कमाईबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. पण या चित्रपटातील कलाकारांनी सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
विवेक अग्निहोत्री हे ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक. त्यांच्या दिग्दर्शनाचं चांगलंच कौतुक होतंय. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांनी तब्बल 1 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं कळतंय.
मिथुन चक्रवर्ती यांनी ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांनी आएएएस ब्रह्म दत्तची भूमिका साकारली आहे. त्यांना या चित्रपटासाठी सर्वाधिक फी मिळाली आहे. होय, या रोलसाठी मिथुन यांनी 1.5 कोटी मानधन घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
अनुपम खेर यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात पुष्करनाथ पंडितची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपार्टनुसार, या चित्रपटासाठी अनुपम खेर यांनी 1 कोटी मानधन घेतलं.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी पल्लवी जोशी हिची देखील ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिने या चित्रपटात राधिका मेननची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिने 50 ते 70 लाख रूपये मानधन घेतल्याचं कळतंय.
दर्शन कुमार यांने कृष्णा पंडित या मुलाची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने 45 लाख रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी 50 लाख रूपये चार्ज केल्याचं कळतंय.
पुनीत इस्सर यांनी यांची चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजतेय. या चित्रपटासाठी त्यांनी 50 लाख रूपये घेतल्याची चर्चा आहे.