The Kashmir files: काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर चर्चेत आलेले जगमोहन होते तरी कोण? काय होती त्यांची भूमिका, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:32 PM 2022-03-15T21:32:51+5:30 2022-03-15T21:37:30+5:30
The Kashmir files: सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडिंतांच्या काश्मीरमधून पलायनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालिन राज्यपाल जगमोहन यांचं नावही चर्चेत आलं आहे. आज आपण जाणून घेऊयात की, Jagmohan कोण होते आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांची काय भूमिका होती त्याबाबत. सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडिंतांच्या काश्मीरमधून पलायनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालिन राज्यपाल जगमोहन यांचं नावही चर्चेत आलं आहे. आज आपण जाणून घेऊयात की, जगमोहन कोण होते आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांची काय भूमिका होती त्याबाबत.
जगमोहन हे आता या जगात नाहीत. गतवर्षी मे महिन्यात त्यांचं निधन झालं. जगमोहन यांची एक कर्तव्यकठोर आयएएस अधिकारी अशी ओळख होती. नंतर ते राजकारणात आले. जम्मू-काश्मीरबरोबरच दिल्ली आणि गोव्यातही राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. ते तीन वेळा खासदार राहिले. प्रथम ते काँग्रेसमध्ये होते नंतर ते भाजपामध्ये आले.
जगमोहन हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय होते. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी त्यांच्याकडे दिल्लीच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे निकटवर्तीय राहिले होते.
१९८४ ते १९८९ या काळात त्यांच्याकडे पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी राज्यात दहशतवाद्यांनी थैमान घातले होते. मोठ्या प्रमाणात रक्तपात होत होता. तेव्हा जगमोहन यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा पेटल्यावर जगमोहन यांच्याकडे पुन्हा एकदा राज्यपालपद सोपवण्यात आले. मात्रा काही महिन्यातच त्यांना हटवण्यात आले. कारण त्यांचे केंद्रातील तत्कालीन व्ही. पी. सिंह सरकारशी दहशतवादाचा मुकाबला करण्यावरून तीव्र मदभेद झाले होते.
दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी अनेक नेते आज जगमोहन यांना जबाबदार धरत आहेत. जगमोहन आरएसएसशी संबंधित होते. आणि व्हीपी सरकारने त्यांना काश्मीरमध्ये पाठवले, त्यानंतर हिंदूंचे तिथून पलायन झाले, असे सांगितले जात आहे.
१९९८ मध्ये जेव्हा वाजपेयी सरकार सत्तेवर आले तेव्हा जगमोहन यांना विविध खात्यांचे मंत्रिपद देण्यात आले होते. १९९० ते १९९६ या काळात ते राज्यसभेत खासदार होते. तर १९९६, १९९८ आणि १९९९ या निवडणुकीत ते दिल्लीतून लोकसभेवर निवडून आले होते.