'The Kashmir Files' सिनेमा गोल्डन फिल्म अवॉर्डनं सन्मानित, विवेक अग्रिहोत्रींची पहिली प्रतिक्रिया- हा लोकांचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:08 PM2022-12-13T18:08:59+5:302022-12-13T20:06:54+5:30

नुकत्याच झालेल्या इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (ITA अवॉर्ड्स 2022) मध्ये 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले, तर काही लोकांनी यावर टीकाही केली. (फोटो: ट्विटर)

नुकत्याच झालेल्या इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (ITA अवॉर्ड्स 2022) मध्ये 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. (फोटो: ट्विटर)

इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स (ITA अवॉर्ड्स) ने 'द कश्मीर फाइल्स'ला 'भारतीय सिनेमाचा गोल्ड चित्रपट' म्हणून सन्मानित केले. (फोटो: ट्विटर)

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्रॉफीसोबतचा एक फोटो शेअर करून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. (फोटो: ट्विटर)

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केलं, '#TheKashmirFiles ला गोल्डन अवॉर्ड दिल्याबद्दल @TheITA_Official धन्यवाद. हा लोकांचा सिनेमा आहे. मी फक्त माध्यम आहे. आम्ही हा पुरस्कार नरसंहारात बळी पडलेल्या सर्व काश्मिरी हिंदूंना समर्पित करतो. (फोटो: ट्विटर)

भारतीय सिनेमाचा गोल्डन फिल्म म्हणून #TheKashmirFiles ला सन्मानित करण्यात आलेला हा पुरस्कार धार्मिक दहशतवादामधील पीडित लोकांना समर्पित आहे.(फोटो: Twitter)

विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट 'द वॅक्सीन वॉर' १५ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट 10 हून अधिक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (फोटो: ट्विटर)