करिअर सुरळीत सुरु असतानाच एका निर्णयाने बॉलिवूडपासून झाली लांब, वाचा फराह नाज आता काय करते? By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 04:15 PM 2021-02-04T16:15:41+5:30 2021-02-04T16:20:24+5:30
अभिनेत्री फराह नाजने बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे.फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. गोविंदासह तिने अनेक सिनेमे केले आहेत. त्याकाळी गोविंदा आणि फरहान या दोघांची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फराहने 1985मध्ये यश चोप्रा बॅनरच्या 'फासले' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
अभिनयासह आपल्या सौंदर्यानेही फराहने रसिकांना वेड लावले होते.
80 आणि 90च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले आहे.
फाराहने 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60 पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. त्यातील अनेक सिनेमे सुपरस्टार ठरलीत.
परंतु बॉलिवूडची ही यशस्वी अभिनेत्री 2005नंतर अचानक या लाइमलाइटच्या जगातून गायब झाली.
करिअर ऐन भरात असताना फराहने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर चंदेरी दुनियापासून दूर गेली आणि संसारात रमली.
लग्नानंतर फराहने सिनेमांपासून लांब राहण्याचाच निर्णय घेतला.
फराहने बिंदू दारा सिंहसह पहिले लग्न केले होते.
फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.
फरहानने नंतर अभिनेता सुमीत सहगलशी लग्न केलं. 51 वर्षीय अभिनेत्री सध्या मुंबईत आपला पती आणि मुलासोबत राहते.
अभिनेत्री फराह नाज तब्बूची थोरली बहीण आहे.