बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत उच्चशिक्षित; त्यांचं शिक्षण पाहून तुम्ही व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:30 PM 2021-12-06T19:30:00+5:30 2021-12-06T19:30:00+5:30
Bollywood celebrites: बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत हे सेलिब्रिटी नेमकं कशा प्रकारे जीवन जगतात हे चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळेच आज बॉलिवूडचे 7 उच्चशिक्षित सेलिब्रिटी कोण ते पाहुयात.
अमिताभ बच्चन- बालिवूडचे शेरशहा अर्थात अमिताभ बच्चन यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्धच्या शिखरावर असलेले बिग बी शिक्षणातही अव्वल आहेत. बिग बींनी नैनीताल येथील शेरवूड महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच दिल्लीतील किरोरीमल महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं.
विद्या बालन - विद्या बालनने मुंबईतील झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्र या विषयाच पदवी मिळवली आहे. तसंच मुंबई युनिव्हर्सिटीतून तिने समाजशास्त्र याच विषयात मास्टर्सही केलं आहे.
जॉन अब्राहम - दमदार अॅक्शन आणि जबरदस्त लुकच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्व:ताची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. जॉनने त्याचं शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिक स्कूलमधून पूर्ण केलं आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण जय हिंद कॉलेजमध्ये केलं आहे. जॉनने अर्थशास्त्र या विषयात ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच त्याने एमबीएची डिग्रीही मिळवली आहे. कलाविश्वात येण्यापूर्वी तो एका अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मीडिया प्लानर म्हणून काम करायचा
अमिषा पटेल - कहो ना प्यार है चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. अनेकदा अमिषा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येतं. तिने कॅथेड्रल अँण्ड जॉन कॅननमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच तिने पुढील शिक्षण टफ्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये केलं असून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
सोहा अली खान - सोहाने तिचे सुरुवातीचे शिक्षण नवी दिल्ली येथील द बिर्टिश स्कूल मधून घेतले. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून इतिहास विषयात पदवी मिळवली आहे. तसंच इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात तिने लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स येथून मास्टर्स डिग्री घेतली आहे.
रणदिप हुड्डा- रणदिपने डॉक्टर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, रणदिपची पावलं अभिनयाकडे वळली. रणदिपने त्याचं शालेय शिक्षण दिल्लीच्या पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केलं आहे. तर उच्च शिक्षण मेलबर्न येथे घेतलं आहे. मेलबर्नमध्ये त्याने बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यात डिग्री घेतली आहे.
आर माधवन - दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन याची लोकप्रियता बॉलिवूडमध्येही तुफान आहे. आर. माधवनने इलेक्ट्रॉनिक्स या विषयात ग्रॅज्युएशन केल्याचं सांगण्यात येतं.