अशी आहे गोविंदा-सुनिता यांची 'Love Story'; लग्नाआधी या 'अॅक्ट्रेस'मुळे मोडला होता साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 21:38 IST2025-02-25T21:25:07+5:302025-02-25T21:38:31+5:30
Govinda-Sunita's 'Love Life' : खरे तर, गोविंदा आणि सुनिता यांच्या लव्ह लाईफमध्ये एखाद्या अॅक्ट्रेसची एंट्री होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्या लव्ह लाईफमध्ये अॅक्ट्रेसमुळे भूकंप आले आहेत.

बॉलिवूडमध्ये हिरो नंबर वन म्हणून ओळखला जाणारा गोविंदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. तसाच तो आता पुन्ह एकदा चर्चेत आला आहे. मात्र ही चर्चा आहे. त्याच्या घटस्फोटाची.
गोविंदाचे नाव एका ३० वर्षीय अज्ञात मराठी अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. यामुळे गोविंदा आणि सुनिता यांचा ३७ वर्षांचा संसार आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आला असल्याच्या चर्चांना माध्यमांमध्ये अक्षरशः उधाण आले आहे.
खरे तर, गोविंदा आणि सुनिता यांच्या लव्ह लाईफमध्ये एखाद्या अॅक्ट्रेसची एंट्री होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्या लव्ह लाईफमध्ये अॅक्ट्रेसमुळे भूकंप आले आहेत.
गोविंदाचे नाव कधी नीलम कोठारी, कधी दिव्या भारती, कधी रानी मुखर्जी, कधी रवीना टंडन आदींशीही जोडले गेले आहे. मात्र, गोविंदाच्या लग्नापूर्वी घडलेल्या एका घटनेची आजही अनेकवेळा चर्चा होताना दिसते, तेव्हा या दोघांचा साखरपुडा देखील मोडला होता.
ही गोष्ट आहे, साधारणपणे १९८६ सालची. गोविंदाचा नुकचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता. तो सुंदर डान्स करायचा. तो डिस्को आणि क्लासिकल असा दोन्ही पद्धतीचा डान्स करत होता. कधी कधी त्याच्या डान्समध्ये डिस्को आणि क्लासिकलचे मिश्रणही दिसायचे. त्याच्या या शैलीमुळे हळू हळू त्याची लोकप्रियता आणि चाहत्यांची संख्याही वाढू लागली.
त्याच्या चाहत्यांच्या यादीत त्याच्या को-स्टार नीलमचाही समावेश होता. जिच्या तो पहिल्यांदा प्रेमात पडला आणि यामुळे गोविंदा-सुनीता यांच्या लव्ह लाईफवरही परिणाम झाला होता.
गोविंदाला आधी नीलमसोबत लग्न करायचे होते - गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने १९९० मध्ये स्टारडस्टला दिलेल्या एक मुलाखतीत खुलासा केला होता की, लग्नाआधीच गोविंदाच्या आयुष्यात एका नायिकेची एंट्री झाली होती. तो त्याची सहकलाकार असलेल्या नीलम कोठारीवर प्रेम करत होता आणि त्याची तिच्यासोबत लग्न करण्याचीही इच्छित होती.
'लव्ह ८६' च्या सेटवर दोघे प्रेमात पडले होते. गोविंदानेही कबूल केले होते की, तो नीलमवर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने आमचा साखरपुडाही मोडला होता. सुनीताच्या म्हणण्यानुसार, तेव्हा आपल्याला नीलम खूप आवडते, असे गोविंदने म्हटले होते.
यानंतर, साधारणपणे एक आठवड्यांतच गोविंदा पुन्हा माझ्याकडे आला आणि 11 मार्च 1987 ला आमचे लग्न झाले, असेही सुनिताने म्हटले होते.
गोविंदा आणि सुनिता...