Top 10 Tollywood Actors: पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम, महेश बाबूला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:42 PM2022-01-24T19:42:15+5:302022-01-24T20:00:03+5:30

पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटामुळे अल्लू अर्जुन (Allu Arjun) चांगलाच चर्चेत आला आहे.

Ormax मीडियाचा साउथ स्टार्सचा मासिक अहवाल समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये यावेळी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच महेश बाबूला मागे टाकले आहे. तर ज्युनियर एनटीआरनेही प्रभासची पिछेहाट केली आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने या यादीत पहिल्यांदाच टॉलिवूडचा प्रिन्स महेश बाबूला मागे टाकले आहे. Ormax मीडियाच्या या ताज्या रिपोर्टमध्ये अल्लू अर्जुनने डिसेंबर महिन्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने यावेळी या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

ऑरमॅक्स मीडियाच्या या ताज्या अहवालात सुपरस्टार प्रभास तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो RRR स्टार ज्युनिअर एनटीआरच्या लोकप्रियतेच्या मागे पडला आहे.

टॉलिवूड प्रिन्स महेश बाबूचा यावेळी टॉप ३मध्ये समावेश झाला नाही. यावेळी महेश बाबूला ऑरमॅक्सच्या मासिक रेटिंग अहवालात चौथे स्थान मिळाले आहे.

पॉवर स्टार पवन कल्याण या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या यादीत त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत राम चरणसारख्या बड्या स्टार्सला मागे टाकले आहे.

RRR स्टार राम चरणला यावेळी ऑरमॅक्स मीडिया मासिक रेटिंग अहवालात सहावे स्थान मिळाले आहे.

लिगर स्टार विजय देवरकोंडाही खूप मागे आहे. त्याला या यादीत सातवे स्थान मिळाले आहे.

नॅचरल स्टार नानीचा श्याम सिंग रॉय या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे तो या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

मेगा स्टार चिरंजीवीला ऑरमॅक्स मीडिया रिपोर्टमध्ये नववे स्थान मिळाले आहे. त्याच्या आरआरआर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.

सामंथा रुथ प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यने या यादीत शेवटच्या स्थानावर आपले स्थान निश्चित केले आहे.