Top Bollywood actress of 90s Looks then and now PSC
नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:00 AM2020-05-28T06:00:00+5:302020-05-28T06:00:02+5:30Join usJoin usNext जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील आयशा जुल्काच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे कौतुक झाले होते. अनिता राजने नवव्दीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता देखील ती मालिका, चित्रपटांमध्ये झळकते. आशिकी या चित्रपटामुळे अनू अग्रवाल एका दिवसांत स्टार बनली होती. तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक तिच्या घरासमोर गर्दी करायचे. फराह नाझ ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण असून तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. किमी काटकरवर चित्रीत झालेले जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. ममता कुलकर्णी नव्वदीच्या दशकातील सगळ्यात जास्त बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे. मिनाक्षी शेषाद्रीने लग्न केल्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. ती सध्या परदेशात तिच्या कुटुंबियांसोबत राहाते. नगमाने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नीलमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिची जोडी गोविंदा आणि चंकी पांडे यांच्यासोबत जास्त गाजली. पूजा भटने अभिनयासोबतच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.टॅग्स :पूजा भटकिमी काटकरPooja BhatKimi Katkar