ग्लॅमरस अन् हॉट दिसतेय तृप्ती डिमरी, लेटेस्ट PHOTOS पाहून तिच्या प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:29 PM2024-12-02T13:29:28+5:302024-12-02T13:38:13+5:30

तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय.

अभिनेत्री तृप्ती डिमरी ही कायम चर्चेत असते. नुकतंच तृप्ती जीक्यू पुरस्कार सोहळ्यात पोहचली. यासाठी तिने खास लूक केला होता.

आता नुकतंच तृप्तीने या लूकचे सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

ज्यात ती अगदी सुंदर दिसतेय. तिने परिधान केलेला गाऊन लक्ष वेधून घेत आहे.

तृप्तीने काळ्या डॉट्सचा पोलका गाऊन परिधान केला होता.

स्मोकी आय मेकअपमुळे तृप्ती स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत होती.

तृप्ती डिमरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

तृप्ती डिमरीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिलाय.

तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'भूल भुलैया 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला.

आता चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ती रणबीरसोबत 'ॲनिमल 2'मध्ये झळकणार आहे.