Try Madhuri Dixit's Beauty Secrets To Get Glowing, Clear Skin Like Her PSC
वयाची पन्नाशी उलटूनही या कारणामुळे माधुरी दीक्षित दिसते तितकीच सुंदर, हे आहेत तिचे ब्युटी सिक्रेट्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:47 PM2020-05-23T16:47:36+5:302020-05-23T17:04:04+5:30Join usJoin usNext माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते. माधुरीच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे याविषयी तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. माधुरी कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्सवर विश्वास न ठेवता तिच्या सौंदर्यासाठी काही घरगुती उपाय करते. माधुरीची त्वचा ही आजही एखाद्या २५-३० वर्षांच्या मुलीसारखीच आहे. तिने हरजिदंगी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याचे रहस्य सांगितले होते. माधुरीने या मुलाखतीत सांगितले होते की, जसजसं तुमचं वय वाढतं तसतसा तुमच्या त्वचेचा ग्लो कमी होतो आणि तुम्हाला डार्क सर्कल देखील यायला लागतात. पण यावर उपाय म्हणजे काकडी आणि दूध. तिने पुढे सांगितले होते की, काकड्याच्या पातळ चकत्या करून त्या दुधात भिजवायच्या आणि या दुधात भिजवलेल्या काकड्या काही काळासाठी फ्रिजमध्ये ठेवायचे. त्या थंड झाल्या की या काकड्या संपूर्ण चेहऱ्यावर चोळायच्या. माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते. माधुरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर अक्षरशः राज्य करत आहे.टॅग्स :माधुरी दिक्षितMadhuri Dixit