unknown things about Scam 1992 harshad mehta aka Pratik Gandhi
हर्षद मेहताच्या भूमिकेने स्टार झालेला प्रतीक गांधी खऱ्या आयुष्यात दिसतो खूप वेगळा, नोकरी सोडून वळला अभिनयाकडे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:17 PM2021-03-12T17:17:54+5:302021-03-12T17:25:55+5:30Join usJoin usNext स्कॅम 1992 ही हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित असून या वेबसिरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. स्कॅम 1992 या वेबसिरिजमुळे एक क्षणात प्रतीक गांधी स्टार झाला. यात तो हर्षद मेहताच्या भूमिकेत दिसला होता. गुजराती रंगभूमी गाजवणा-या प्रतिकने 2014 साली ‘बे यार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. प्रतिकने 2004 मध्ये गुजराती नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘युअर्स इमोशनली’ या इंग्रजी चित्रपटातही तो झळकला. मोहन नो मसालो, हू चंद्रकांत बक्षी यांसारख्या नाटकांमध्ये प्रतिकने साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. मूळचा सूरता असलेला प्रतिक इंजिनिअर आहे. पुढे सेल्सपर्सन म्हणूनही त्याने काम सुरु केले आणि सोबत सोबत नाटक, लाईव्ह शो करू लागला. इंजिनिअर झालेल्या आपल्या मुलाने मोठ्या पगाराची नोकरी करावी, अशी खरे तर प्रतिकच्या कुटुंबाची इच्छा होती. पण प्रतिकने एकदिवस मी अॅक्टिंगमध्ये करिअर करणार, असे घरच्यांना स्पष्ट सांगितले. केवळ सांगितले नाही तर 2016 मध्ये इंजिनीअरिंगची नोकरी सोडून तो पूर्णवेळ अॅक्टिंग करू लागला. राँग साइड राजू, व्हेंटिलेटर, मित्रों , लवयात्री या चित्रपटांमध्ये त्याला भूमिका मिळाल्या आणि या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले. याचदरम्यान हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992’साठी त्याला विचारले आणि प्रतिकने लगेच या वेबसीरिजसाठी होकार दिला. या वेबसीरिजने प्रतिक अचानक प्रसिद्धीझोतात आला. प्रतीक सध्या चांगलाच प्रसिद्ध असून त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. टॅग्स :स्कॅम १९९२Scam 1992