कलंकच्या प्रदर्शनानंतर वरुण धवन आणि आलिया भट पोहोचले करण जोहरच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 18:51 IST2019-04-18T18:47:23+5:302019-04-18T18:51:37+5:30

कलंक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला असून हा चित्रपट या वर्षांतील बिगेस्ट ऑपनर ठरला आहे.
कलंक या चित्रपटात वरुण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असून त्या दोघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक होत आहे.
वरुण आणि आलियाला नुकतेच या चित्रपटाचा निर्माता करण जोहरच्या घरात जाताना पाहाण्यात आले.