दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही

By देवेंद्र जाधव | Updated: April 8, 2025 17:28 IST2025-04-08T16:32:11+5:302025-04-08T17:28:30+5:30

कोण म्हणतं मुंबई तर कुणी सांगतं जॉर्डन, नक्की आहे कुठे अभिनेत्री? जाणून घ्या रंजक किस्सा

एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी तिच्या सौंदर्यामुळे सगळ्यांमध्ये चर्चेत होती. पण करिअरच्या शिखरावर असताना अचानक ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली. या अभिनेत्रीचं नाव जॅस्मिन धुन्ना

१९८८ साली रिलीज झालेल्या 'वीराना' सिनेमामुळे जॅस्मिन प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. १९७९ ते १९९० चा काळ जॅस्मिनने तिच्या सिनेमांमुळे चांगलाच गाजवला. वयाच्या ११ व्या वर्षी जॅस्मिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं

जॅस्मिनच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ पडली होती. इतकंच नव्हे डॉन दाऊदही जॅस्मिनचा चाहता होता. दाऊदला कोणत्याही परिस्थितीत जॅस्मिन हवी होती, असं सांगण्यात येतं.

डॉन दाऊदच्या भीतीमुळे जॅस्मिनने तडकाफडकी इंडस्ट्री सोडली आणि परदेशात स्थायिक झाली. जॅस्मिन कोणत्या देशात होती, तिचं पुढचं आयुष्य कसं गेलं याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

गेल्या ३७ वर्षांपासून जॅस्मिन इंडस्ट्रीतून गायब आहे. काही रिपोर्ट्सनुसार जॅस्मिनने जॉर्डन देशात स्थायिक होऊन तिथे एका व्यक्तीशी लग्न केलं. परंतु याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही.

'वीराना' सिनेमा ज्यांनी बनवला अशा श्याम रामसे या दिग्दर्शकांनी याविषयी मोठा खुलासा केला होता. जॅस्मिन जिवंत आहे आणि ती मुंबईत आहे. तिची आई आजारी असल्यामुळे तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता.

काही दिवसांनी आईचं निधन झाल्यावर जॅस्मिनचं सर्व गोष्टींमधून मन उडालं.तिला शॉक बसला त्यामुळे तिने इंडस्ट्री सोडली. अशाप्रकारे जॅस्मिन गेली ३७ वर्ष अज्ञातवासात आहे.