Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:06 PM2022-12-30T14:06:34+5:302022-12-30T14:12:24+5:30

Vicky Kaushal-Katrina Kaif : कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये न्यू इअर व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

२०२२ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी सुट्टीवर गेले आहेत. या यादीत बॉलिवूडचे क्यूट कपल कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांचाही समावेश आहे.

कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये न्यू इअर व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.कतरिनाने तिचा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

कतरिना विकीला जंगलात बिबट्या ते हरण बघायला मिळाले, ज्याचे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अगदी जादुई. मला वाटते की हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

कतरिनाने विकी कौशलसोबत जंगलात आराम करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत जंगलाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे लोकेशन राजस्थानच्या जोधपूरजवळील जवाईचे आहे. कॅटला राजस्थान खूप आवडते. तिला अनेकदा इथे यायचं असतं.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर विकी कौशल शेवटचा गोविंदा मेरा नाममध्ये दिसला होता.

तर कतरिना फोन भूतमध्ये दिसली होती. ती आता मेरी ख्रिसमस आणि टायगर 3 मध्ये दिसणार आहे.